ETV Bharat / state

CM Eknath Shinde : सातार्‍यात पाचशे एकर क्षेत्रावर कृषी इंडस्ट्री उभारणार, मुख्यमंत्र्यांची कृषी प्रदर्शनात घोषणा - उद्योगमंत्री उदय सामंत

सातारा जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रावर कृषी इंडस्ट्रीज उभारणार (Agriculture industry will be set up in Satara) असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडमधील यशवंत कृषी, औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शनांच्या उद्घाटनप्रसंगी केली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी उपस्थित (Eknath Shinde announced in agriculture exhibition) होते.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Nov 27, 2022, 12:40 PM IST

सातारा : रावणाला दहा तोंडे होती. परंतु, शेतकर्‍यांच्या प्रश्नाला शंभर तोंडे आहेत. त्यामुळे कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्त उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने नवनवे तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावे. मी देखील शेतकर्‍यांच्या हितासाठी कटीबध्द असून सातारा जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रावर कृषी इंडस्ट्रीज उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कराडमधील यशवंत कृषी, औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शनांच्या उद्घाटनप्रसंगी (Eknath Shinde announced in agriculture exhibition) केली.

षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उद्योगमंत्री उदय सामंत

यशवंतरावांचे कार्य महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद : एकनाथ शिंदे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कराडमध्ये होणारे कृषी प्रदर्शन ही कौतुकास्पद बाब आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासात दिलेले योगदान अभिमानास्पद असून सत्ता, पदे येतात आणि जातात. मात्र, नेत्याला लोकांशी जिव्हाळ्याचे नाते जपता आले पाहिजे, हा गुण यशवंतरावांकडून शिकण्यासारखा आहे. गेल्या तीन-चार महिन्यात सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्याचा सुपुत्र असल्याचा मला अभिमान असून या जिल्ह्याप्रती माझी जबाबदारी आता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला निधी कमी पड़ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी (agriculture exhibition in Satara) दिली.

कृषी संशोधन केंद्र सुरू करणार : कराडचे कृषी प्रदर्शन हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे. माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांनी या प्रदर्शनाची मुहुर्तमेढ रोवली. हे कृषी प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी पर्वणी ठरत आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र सुरू करणार आहोत. तसेच जलयुक्त शिवारसारखी योजनाही राबविणार आहोत. त्यासाठी सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांनी विशेष निधी द्यावा, अशी मागणी पालकमंत्री शंभूराज देसाईंनी (Agriculture industry will be set up in Satara) केली.

घोषणा तुमची, कार्यवाही आमची : पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या 7 लाख शेतकर्‍यांच्या खात्यावर 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान शिंदे सरकारने जमा केल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले, यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी ते तर आम्ही जाहीर केले होते, असे निदर्शनास आणताच निर्णय तुम्हीच घेतला, पण दिले आम्ही, असे सामंत यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा (Shinde announced in agriculture exhibition satara) पिकला. Conclusion:व्हिडिओ - कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उद्योगमंत्री उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.