सातारा - साताऱ्यातील मलकापूर नगरपालिकेचे नगरअभियंता आणि सध्या कराड नगरपालिकेचा प्रभारी चार्ज असलेला शशिकांत सुधाकर पवार याच्यासह खासगी इसम सुदीप एटांबे याला 30 हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रस्त्याच्या कामाचे बील काढण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.
लाच घेताना पकडले एसीबीने - रस्त्याच्या कामाचे बील काढण्यासाठी 30 हजार रूपयांची लाच स्वीकारताना खासगी इसमासह मलकापूर नगरपालिकेच्या नगर अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
बील काढण्यासाठी लाचेची मागणी - तक्रारदार हे मूळ ठेकेदारांच्या फर्म अंतर्गत उप ठेकेदारीचे काम करतात. त्यांनी कराडमधील वाखाण भागातील रस्त्याचे काम केले होते. त्याचे २१ लाख ७५ हजार रूपये बील झाले होते. यापैकी 15 लाख रूपये तक्रारदारास मिळाले होते. उर्वरित बील मंजुरीसाठी नगरअभियंता शशिकांत पवारने ४२ हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार रूपये देण्याचे ठरले होते.
खासगी इसमामार्फत लाच स्वीकारली - नगर अभियंता शशिकांत पवार याने तक्रारदारास खासगी इसम सुदीप दीपक एटांबे (रा. मलकापूर) याच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले होते. ही लाच स्वीकारताना सुदीप एटांबे व नगरअभियंता शशिकांत पवार या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
दोन दिवस पोलीस कोठडी - लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शशिकांत पवार आणि सुदीप एटांबे यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. लाच घेताना पकडल्यानंतर एसीबीच्या पथकाने शशिकांत पवारच्या घराची झडती घेतली. मात्र, हाती काही लागले नाही.
हेही वाचा -