सातारा - छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन उद्धघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते शुक्रवारी (9 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता होणार आहे.
हेही वाचा - देशातील 'इतकी' विद्यापीठे सापडली बनावट; उत्तर प्रदेश, दिल्लीत मोठी संख्या
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर असणार आहेत. या रुग्णालयामध्ये 234 ऑक्सिजन बेड व 52 आयसीयू बेड आहेत. डायलिसीस असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयं घेत नाहीत. अशा रुग्णांसाठीही 4 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची तपासणी करुन या रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खासदार उदयनराजे भोसले, श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, मोहनराव कदम, पृथ्वीराज चव्हाण, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, महेश शिंदे, मकरंद पाटील, दिपक चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
बांधकाम, विद्युत, उपकरणे, मनुष्यबळ व इतर गोष्टींसाठी सुमारे २७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रुग्णांची तपासणी करून या रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. कोविड रुग्णालय उभारणीसाठी राज्य शासनाबरोबर स्वयंसेवक, उद्योगांनी मदत केली आहे.