सातारा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आज शुक्रवारी सायंकाळी सातारा जिल्हा दौऱ्यावर CM on Satara district tour येत आहेत. सायंकाळी हेलिकॉप्टरने त्यांचे महाबळेश्वरात Mahabaleshwar by helicopter आगमन होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाबळेश्वरमधील हिरडा नाका येथे जिल्ह्याच्या विकासासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक Review meeting Administrative Officers होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे महाबळेश्वरात बंदोबस्तासाठी पोलिसांची Police धावपळ सुरू झाली आहे.
जिल्ह्याच्या विकासाचा मुख्यमंत्री घेणार आढावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासात गांभीर्याने लक्ष घातले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम आणि पूर्व भागाची भौगोलिक परिस्थिती परस्पर भिन्न आहे. पश्चिमेकडे मुबलक पाऊस तर पुर्वेकडे दुष्काळ असतो. त्यामुळे विकासाचे प्रश्न देखील वेगळे आहेत. जिल्ह्याच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत होणारी आजची बैठक महत्वाची ठरणार आहे.
केबल स्टेड पुलामुळे पर्यटनाला मिळणार चालना : कोयना जलाशयात महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिर असा केबल स्टेड पूल उभारला जाणार आहे. पुलाचे काम लवकरच सुरू होत असून हा पूल झाल्यानंतर कांदाटी, सोळशी आणि कोयना खोरे एकमेकांना जोडले जाणार आहे. पुलावर पर्यटकांसाठी 43 मीटर उंचीवर व्हीव्हींग गॅलरी असणार आहे. त्यामुळे कोयना जलाशयाच्या आतील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना पाहता येणार आहे. अंदाजे 175 कोटी रुपये खर्चातून हा पूल उभारला जाणार आहे.
हेही वाचा - Ghulam Nabi Azad To Form New Party गुलाम नबी आझाद स्थापन करणार नवा राजकीय पक्ष