ETV Bharat / state

CM helicopter break down : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, सातारा दौरा आधी रद्द, दुरुस्तीनंतर मुख्यमंत्री कराडकडे रवाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होऊन त्यांचे हेलिकॉप्टर राजभवन परिसरातच भरकटले. मुख्यमंत्री सुरक्षित आहेत. त्यांनी आपला सातारा दौरा अचानक रद्द केला आहे. मात्र पुन्हा हेलिकॉप्टरची दुरुस्ती करुन मुख्यमंत्री कराडकडे रवाना झाले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : May 13, 2023, 11:51 AM IST

सातारा - सत्तासंघर्षावरील निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सातारा दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतून कराडकडे यायला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये सुरुवातीला बिघाड होऊन त्यांचे हेलिकॉप्टर राजभवन परिसरातच भरकटले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला. मात्र पुन्हा हेलिकॉप्टरची पाहणी करण्यात आली. त्याची किरकोळ दुरुस्ती करुन पुन्हा मुख्यमंत्री कराडकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा - सातारा जिल्ह्यातील मरळी (ता. पाटण) येथे 'शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठी सातारा आणि पाटणमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. शासकीय योजनेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांकडून आगामी निवडणुकीची साखर पेरणी होईल अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री यापूर्वीही नेहमीच सातारा दौऱ्यावर आले आहेत. सातारा जिल्ह्यातच त्यांचे गाव असल्याने त्यांचे सातारा जिल्ह्यावर चांगलेच लक्ष असते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक कामे त्यांनी स्वतः मार्गी लावल्याचे दिसून येते. शिवसेनेचे आमदार असलेले शंभुराज देसाई जे सध्या शिंदे यांच्या मंत्रिमडळातही आहेत, त्यांच्या कारखान्यावर कार्यक्रम असल्याने मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यावेळी त्यांना नुकत्याच घटनापीठाने घेतलेल्या भूमिकेबद्दलही छेडण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच त्यांची आगामी रणनिती काय असेल आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही काही सूचक वक्तव्य मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे.

अपडेट लवकरच...

हेही वाचा

  1. Grand verdict of Karnataka Live Update : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता, कुणाच्याही कुबड्यांची गर लागणार नाही अशीच चन्हे
  2. Karnataka election big fights : कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी आघाडीवर
  3. MES Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 निकालात सीमावर्ती भागात एमईएस उधळणार गुलाल
  4. Karnataka Election Result 2023 : नागरिकांना बदल हवा आहे म्हणत काँग्रेस कार्यालयात जल्लोष सुरू, भाजप, जेडीएस नेते हवालदिल
  5. Shivsena criticizes BJP : चोर आणि लफंगे हीच सत्तेची गुरुकिल्ली, सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा समाचार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.