सातारा Chandrashekhar Bawankule On Congress : काॅंग्रेस पार्टी म्हणजे ब्लड कॅन्सर असून काॅंग्रेसच्या रक्तात कन्फ्यूज करण्याचं राजकारण असल्याची घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी साताऱ्यातील कार्यक्रमात बोलताना केलीये. कॉंग्रेसनं कन्फ्युज केलेल्या लोकांना आम्ही कन्व्हेन्स करायला चाललोय, असेही बावनकुळे म्हणालेय.
कॉंग्रेसने लोकांना कन्फ्यूज केलं : मेरी माटी मेरा देश, सुपर वॉरिअर्सशी संवाद आणि घर चलो अभियानासाठी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले, असता चंद्रशेखर बावनकुळेंनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. कॉंग्रेसनं गेली ६५ वर्षे लोकांना डेव्हलपमेंटचं काही सांगितलं नाही. फक्त लोकांना कन्फ्यूज केलंय. तसंच कन्फ्यूज झालेल्यांना कन्व्हेन्स करण्यासाठी आम्ही बाहेर पडलोय, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
महायुतीत भाजपच मोठा भाऊ : पुढं बोलत असताना बावनकुळे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सरकारचे प्रमुख आहेत. हे कुणीच नाकारू शकत नाही. २०२४ पर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील. परंतु, महायुतीमध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार, खासदार असल्यानं महायुतीमध्ये भाजपच ‘मोठा भाऊ’ आहे, असा दावाही त्यांनी केलाय.
कॉंग्रेसमध्ये घटक पक्षांना सन्मान नाही : भाजपकडून घटक पक्षांना जो सन्मान दिला जातो, तो कॉंग्रेसमध्ये मिळू शकत नाही. जेव्हा मूळ हिंदूत्वाची युती टिकविण्यासाठी एकनाथ शिंदे भाजपसोबत आले, तेव्हा त्यांना न मागता भाजपनं मुख्यमंत्रीपद दिलं. तसेच सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीचाच उमेदवार निवडून आणण्याचा निश्चय भाजपनं केला. पक्षाचे ‘सुपर वॉरिअर्स’ प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील ६०० घरी पोहेचतील व मविआनं जनतेत पसरविलेला संभ्रम दूर करतील, असा विश्वासही यावेळी बावनकुळेंनी व्यक्त केलाय.
बाजारपेठांमध्ये मोदी.. मोदींचे नारे : साताऱ्यात मोती चौक ते जुना मोटर स्टॅंड आणि कराडमध्ये आझाद चौक ते चावडी चौक या बाजारपेठ मार्गावरील रॅलीत चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते. यावेळी 'मोदी.. मोदी..' असा नारा बाजारपेठेत घुमला.
हेही वाचा -
- Bawankule On Nana Patole : पंतप्रधानांनी देशासाठी काय केलं; नाना पटोलेंनी माझ्यासोबत करावी खुली चर्चा, बावनकुळेंचं आव्हान
- Chandrashekhar Bawankule News: उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
- Lathicharge on Maratha Protester : आधी मोठे मोर्चे निघाले, पण आताच....? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल