ETV Bharat / state

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर साताऱ्यात जल्लोष - उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसलेंनी केलेल्या प्रवेशानंतर साताऱ्यात जल्लोष व्यक्त केला जात आहे. तर उदयनराजेंनी भावनिक ट्वीट करुन सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

उदयनराजे भोसले
author img

By

Published : Sep 14, 2019, 2:17 PM IST

सातारा - राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर साताऱ्यात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला आहे.

साताऱ्यातील जल्लोषाची दृष्ये

'आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे की आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील,’ असे भावनिक ट्वीट करत उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले हे साताऱ्याचे सलग तीन वेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार राहिले आहेत. मात्र, त्यांनी दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. कार्यकर्त्यांमध्ये मात्र, उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र जल्लोष केला जात आहे.

हेही वाचा - अखेर उदयनराजेंनी हाती घेतलं 'कमळ', अमित शाहंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

Intro:सातारा राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच अमित शहांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात अनेक ठिकाणी जलोष करण्यात आला आहे. उदयनराजे भोसले हे सातारचे सलग तीन वेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार झाले होते. त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे.Body:‘आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे की आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील,’ असं भावनिक ट्वीट करत उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.