सातारा - पीएमसी, एचडीआयएलमधील हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ( HDIL scam case ) कारवाई झालेल्या कपील, ( Rakesh Vavdhan ) तसेच धीरज वाधवान या बंधूंच्या महाबळेश्वरमधील अलिशान बंगल्यावर आज सीबीआयने छापा टाकला ( CBI raid on Wadhwan brother bungalow ) आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सीबीआयने केलेल्या या कारवाईत बंगल्यातून कोट्यवधी रूपये किंमतीची परदेशी पेंटिग्ज-पोट्रेट ( Foreign paintings portraits ) ताब्यात घेतली आहेत. शुक्रवारी वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयची टीम दाखल झाली होती.
स्थानिक पोलिसांसमवेत सीबीआयचा छापा - शनिवारी सीबीआयचे अधिकारी ( CBI officer ) महाबळेश्वरच्या पोलिसांसमवेत वाधवान बंधूंच्या बंगल्यांवर हजर झाले. सीबीआय अधिकार्यांनी बंगल्यातून परदेशी पेंटिंग्स-पोट्रेट सील ( Foreign paintings portraits ) करुन ताब्यात घेतली आहेत. त्याची किंमत कोट्यवधी रूपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. ही पेंटिंग कुठून आणि कशी आणली गेली, याचा तपास सीबीआयचे अधिकारी करत आहेत.
कारवाईबाबत सीबीआयकडून गुप्तता - महाबळेश्वरमध्ये वाधवान बंधूंचा 5 एकर जागेत प्रशस्त बंगला आहे. गेल्या दोन वर्षापासून वाधवान बंधू पीएमसी बँक, ( PMC Bank scam ) एचडीआयलएलमधील हजारो कोटींच्या घोटाळ्यामुळे ईडी, सीबीआयच्या रडावर आहेत. याप्रकरणी सीबीआयने यापुर्वीही वाधवान बंधूंच्या बंगल्यावर छापा मारला होता. शनिवारी दुसर्यांदा सीबीआयचे अधिकारी स्थानिक पोलिसांसमवेत कारवाईसाठी आले आहेत. या कारवाईबाबत सीबीआयच्या पथकाने अत्यंत गोपनीयता बाळगली होती. तसेच संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. कारवाईची कोणालाही कुणकुण लागू दिली नाही. अधिकार्यांनी दीड तास बंगल्यात झडती घेतली. पोलिसांनी कारवाईबाबात मौन बाळगत काहीही सांगण्यास नकार दिला.
लॉकडाऊनमध्ये नियम डावलून वाधवान बंधू आले होते महाबळेश्वरात - लॉकडाउनमध्ये वाधवान कुटुंबिय 5 गाड्यांमधून महाबळेश्वरला गेल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. प्रधान सचिव अमिताभ गुप्ता ( Principal Secretary Amitabh Gupta ) यांच्या पत्राच्या आधारे ते आडकाठीविना महाबळेश्वरात दाखल झाले होते. यावरून वाद निर्माण होताच वाधवान बंधूंना कुटुंबियांसह पाचगणीच्या दिवाण व्हिला हॉटेलमध्ये 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते.
हेही वाचा - Umesh Kolhe Murder Case : धमकी मिळालेल्या तक्रारदाराच्या घराची रेकी; अमरावती पोलीस सतर्क