ETV Bharat / state

लाचखोर लिपिकावर गुन्हा दाखल, अटकेच्या भीतीने तो पसार - लाचखोर लिपीक बातमी

वाईतील शासकीय रुग्णालयाच्या लिपिकाविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखळ होताच लिपिक पसार झाला.

वाईतील शासकीय रुग्णालयाच्यालाचखोर लिपीकावर गुन्हा दाखल
author img

By

Published : Sep 2, 2019, 9:42 AM IST

सातारा - लाचेसाठी 40 हजार रुपयांची मागणी केल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाचा (सिव्हील) लिपिक अमित राजे याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच हा पसार झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभाग (एसीबी) अमित राजेचा शोध घेत आहेत. त्याला शोधण्यासाठी ठिकठिकाणी पथके रवाना झाली आहेत.

वाई येथील रुग्णालयाचे नुतनीकरण व सोनोग्राफी मशीनच्या नोंदणीचे काम शासकीय रुग्णालयात होते. मे पासून संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापन याबाबत पुर्तता करण्यासाठी शासकीय रुग्णालयात हेलपाटे मारत होते. तक्रारदार याप्रकरणी अमित राजे याला भेटत होते. या दोन्ही कामासाठी संशयिताने 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. संबंधित तक्रारदार हॉस्पिटलचे काम रीतसर असतानाही लाचेची मागणी झाल्याने त्यांनी जून महिन्यात एसीबी विभागात तक्रार केली.

एसीबी विभागात तक्रार दाखल झाल्यानंतर याबाबत पडताळणी झाली असताना संशयिताने 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. लाचेची मागणी झाल्यानंतर अखेर शुक्रवारी एसीबी विभागाने त्याला पकडण्यासाठी ट्रॅप लावला. मात्र, तोपर्यंत अमित राजे पसार झाला. संशयित पसार झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासंबंधी थेट सिव्हील सर्जन (सीएस) डॉ. अमोद गडीकर यांच्याकडे चौकशी करण्यात आली. यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. चौकशी केल्यानंतर सीएसला सोडून देण्यात आले.

Intro:सातारा लाचेसाठी 40 हजार रुपयांची मागणी केल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाचा (सिव्हील) लिपीक अमित राजे याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होताच तो पसार झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभाग (एसीबी) संशयित अमित राजेचा शोध घेत असून त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना झाली आहेत.

Body:वाई येथील हॉस्पिटलचे नुतनीकरण व सोनोग्राफी मशीनच्या नोंदणीचे काम सिव्हीलमध्ये होते. मे पासून संबंधित हॉस्पिटलचे मॅनेजमेंट याबाबीच्या पुर्तता करण्यासाठी सिव्हीलमध्ये हेलपाटे मारत होते. तक्रारदार हे याप्रकरणी अमित राजे याला भेटत होते. या दोन्ही कामासाठी संशयिताने 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. संबंधित तक्रारदार यांच्या हॉस्पिटलचे काम रीतसर असतानाही लाचेची मागणी झाल्याने त्यांनी जून महिन्यात एसीबी विभागात तक्रार केली.

एसीबी विभागात तक्रार दाखल झाल्यानंतर याबाबत पडताळणी झाली असताना संशयिताने 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. लाचेची मागणी झाल्यानंतर अखेर शुक्रवारी एसीबी विभागाने त्याला पकडण्यासाठी ट्रॅप लावला. मात्र तोपर्यंत अमित राजे पसार झाला. संशयित पसार झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासंबंधी थेट सिव्हील सर्जन (सीएस) डॉ.अमोद गडीकर यांच्याकडे चौकशी करण्यात आली. यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. चौकशी केल्यानंतर सीएसला सोडून देण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.