सातारा : साताऱ्यात बुधवारी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मोठा वाद उफाळला होता. उदयनराजे यांनी शिंवेंद्रराजे यांचा कार्यक्रम उधळून लावला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. बाजार समितीचे अध्यक्ष विक्रम पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह ५० जण बाजार समितीच्या नियोजित बांधकामाच्या ठिकाणी आले. पोलीस असतानाही त्यांनी विकासाच्या कामास विरोध केला. या जागेत पाय ठेवल्यास खल्लास करीन, अशी उदयनराजेंनी धमकी दिली.
पोकलेनच्या साह्याने कंटेनरची तोडफोड : सातारा शहरालगत असलेल्या खिंडवाडी येथील जागेवरून हा वाद सुरू आहे. घटनास्थळी ठेवलेल्या लोखंडी कंटेनरची पोकलेनच्या साह्याने तोडफोड करून दोन लाख रुपयांचे नुकसान केले आहे. विकासाचे काम करून दिले नाही. उदयनराजेंनी जिवे मारण्याची धमकी दिली, असे विक्रम पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार उदयनराजेंसह ५० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गर्दी जमवणे, दमदाटी आणि मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही राजे फडणवीसांच्या भेटीला : सातारा बाजार समितीच्या नियोजित इमारतीच्या भुमीपूजनावेळी झालेल्या वादानंतर दोन्ही राजेंनी गुरूवारी सकाळी कराडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृष्णा हॉस्पिटलच्या विश्रामगृहात भेट घेतली. पहिल्यांदा आमदार शिवेंद्रराजे भोसले हे फडणवीसांना भेटले. त्यावेळी उदयनराजे भोसले हे खाली थांबले होते. शिवेंद्रराजे खाली आल्यानंतर उदयनराजे आणि फणडणवीसांची बैठक झाली. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात नेहमीच वाद सुरु असतात. दोघेही कोणत्या न कोणत्या कारणाने एकमेकांवर टीका करत असतात.
हेही वाचा :
- Udayanaraje VS Shivendraraje Bhosale: साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे आमनेसामने; बाजार समिती जागेतील भूमिपूजनावरून झाला वाद
- Shivendra Raje criticism Udayan Raje: मी नारळफोड्या गँगकडे लक्ष देत नाही; आ. शिवेंद्रराजेंची खा. उदयनराजेंवर टीका
- ShivendraRaje on UdayanRaje : जम्मू-काश्मिरच्या वादापेक्षा उदयनराजेंच्या पेंटिंगचा वाद गहण; आमदार शिवेंद्रराजेंची उपरोधिक टीका