सातारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या Satara Cable Sted Bridge News दरे गावाला आणि कांदाटी खोर्याला जोडणार्या पुलाचे Bridge Connecting CM Dare Village to Kandati Valley काम Cable Stayed Bridge From Tapola to Ahir in Mahabaleshwar Taluka लवकरच सुरू होत आहे. कोयना जलाशयात महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिर असा केबल स्टेड पूल Cable Stayed Bridge उभारला जाणार आहे. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित केबल स्टेड पुलावर 43 मीटर उंचीवर प्रेक्षागॅलरी असणार आहे. त्यामुळे हा पूल प्रेक्षकांचे आकर्षण स्थान ठरणार आहे.
तापोळा ते अहिर असा केबल स्टेड पूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाला आणि कांदाटी खोर्याला जोडणार्या पुलाचे काम लवकरच सुरू होत आहे. कोयना जलाशयात महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिर असा केबल स्टेड पूल उभारला जाणार आहे. हा पूल झाल्यानंतर कांदाटी, सोळशी आणि कोयना खोरे एकमेकांना जोडले जाणार आहेत. पुलावर पर्यटकांसाठी 43 मीटर उंचीवर व्हिव्हिंग गॅलरी असणार आहे. त्यामुळे कोयना जलाशयाच्या आतील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना पाहता येणार आहे. अंदाजे 175 कोटी रुपये खर्चातून हा पूल उभारला जाणार आहे.
जर्मन तंत्रज्ञानावर आधारित पूल पर्यटनवाढीला चालना देणारा हा पूल 540 मीटर लांबीचा असेल. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित केबल स्टेड पुलावर 43 मीटर उंचीवर प्रेक्षागॅलरी असणार आहे. महाबळेश्वरला दरवर्षी 20 लाख पर्यटक भेट देतात. या पर्यटकांना महाबळेश्वर परिसराचे सौंदर्य पाहता यावे तसेच दुर्गभ भाग एकमेकांना जोडण्यासाठी शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहीरदरम्यान हा पूल बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा पूल उभारल्यानंतर कोयना जलाशयाच्या आतील लोकांना तापोळा, महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी लवकर पोहोचणे शक्य होईल.
धोकादायक जलप्रवास टळणार सध्या कांदाटी, सोळशी आणि कोयना खोर्यातील लोकांना कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातून धोकादायक प्रवास करीत बाजारपेठेच्या ठिकाणी यावे लागते. हा पूल झाल्यानंतर दुर्गम भाग जोडला जाऊन अंतरही कमी होणार आहे. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील, तसेच सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील शेती कुटीर उद्योगास चालना मिळेल. तसेच नैसर्गिक आपत्तीवेळी जलाशयापलीकडील गावात मूलभूत सुविधा तातडीने पोचविणेही शक्य होईल. पुलावरील व्हिहिंग गॅलरीतून पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येईल.
मुख्यमंत्र्यांमुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या आशा पल्लवीत महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव. या गावाला जाण्यासाठी जलाशयातून प्रवास करावा लागतो. जलाशयाच्या आत असणारी गावे दळणवळणाच्या सोईअभावी दुर्गम आहेत. या भागातला भूमीपूत्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागाला विकासाच्या प्रवाहात आणतील, असा त्यांना विश्वास असून तापोळा-अहिर हा पूल त्याचीच सुरुवात ठरणार आहे.