ETV Bharat / state

डिझेल अभावी लालपरीचा वेग मंदावला; ग्रामीण भागातील फेर्‍या रद्द - सातारा बस सेवा न्यूज

एसटी डेपोच्या पंपावरील डिझेल संपल्याने सातार्‍यातील पाटण, वाई, मेढा, महाबळेश्वर आगारांना ग्रामीण भागातील फेर्‍या रद्द कराव्या लागल्या आहेत. सुमारे आठ दिवसांपासून डिझेलचे टँकर न आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

State transport depo
एसटी आगार
author img

By

Published : Mar 20, 2021, 6:36 PM IST

Updated : Mar 20, 2021, 6:43 PM IST

सातारा - मागील आठवड्यात राष्ट्रीयीकृत बँका सलग पाच दिवस बंद राहिल्याचा मोठा परिणाम एसटी महामंडळाच्या वाहनांवर झाला आहे. एसटी डेपोच्या पंपावरील डिझेल संपल्याने सातार्‍यातील पाटण, वाई, मेढा, महाबळेश्वर आगारांना ग्रामीण भागातील फेर्‍या रद्द कराव्या लागल्या आहेत.

एसटी डेपोच्या पंपावरील डिझेल संपल्याने सातार्‍यातील पाटण, वाई, मेढा, महाबळेश्वर आगारांना ग्रामीण भागातील फेर्‍या रद्द कराव्या लागल्या आहेत. सुमारे आठ दिवसांपासून डिझेलचे टँकर न आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा-आता धावत्या लोकलमध्ये मिळणार मास्क; मध्य रेल्वेने मास्क विक्रीला दिली परवानगी

डेपावर एसटी गाड्यांच्या लागल्या रांगा-

मागील शनिवारपासून मंगळवारपर्यंत बँका बंद राहिल्या होत्या. त्यामुळे आरटीजीएसद्वारे पैसे पाठविता येत नव्हते. ऑईल डिलर कंपनीने उधारीने (क्रेडिट) इंधन बंद केले आहे. त्यामुळे अगोदर पैसे पाठविल्याशिवाय डिझेलचा टँकर कंपनी पाठवित नाही. याच कारणामुळे जिल्ह्यातील चार ते पाच आगारांमध्ये डिझेलचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे होते ते डिझेल संपल्यामुळे पाटण, वाई, मेढा, महाबळेश्वर या आगारांना ग्रामीण भागातील अनेक फेर्‍या रद्द कराव्या लागल्या आहेत. तर काही मार्गांवरील फेर्‍या कमी कराव्या लागल्या आहेत. फलटण, कराड या आगारातील डिझेलचा साठाही संपत आला आहे. महाबळेश्वर, वाई, मेढा आगारातून सातारला येणार्‍या गाड्यांमध्ये सातारा डेपोतील पंपावर डिझेल भरले जात आहे. यामुळे सातारा डेपोतील पंपावर एसटी गाड्यांची रांग लागल्याचे पहायला मिळत आहे.

डिझेल अभावी ग्रामीण भागातील फेर्‍या रद्द

हेही वाचा-प्रियंका गांधींच्या आसाममध्ये होणार सहा सभा

एसटीचे वेळापत्रक कोलमडले-

कराड एस. टी. आगारात पाटण व वडूज आगारातील गाड्यांमध्ये डिझेल भरले जात आहे. अन्य आगाराच्या गाड्यांना डिझेल द्यावे लागत असल्याने सातारा आणि कराड आगारातील डिझेलही संपत आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच आगारांच्या ग्रामीण फेर्‍यांवर परिणाम झाला आहे. पाटण, मेढा, महाळेश्वर आगारातून प्रामुख्याने दुर्गम भागात एसटीच्या फेर्‍या सोडणे गरजेचे असते. मात्र, डिझेल संपल्यामुळे ग्रामीण भागातील एसटीचे वेळापत्रक कोलमडले आहे.

हेही वाचा-राष्ट्र्वादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसद महारत्न' पुरस्कार प्रदान

चालक-वाहनांना घ्यावी लागली रजा-

इंधना अभावी एसटीच्या ग्रामीण भागातील दिवसाच्या फेऱ्यांबरोबरच अनेक दुर्गम गावातील मुक्कामी गाड्यासुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चालक-वाहकांना रजा घ्यावी लागली आहे.

Last Updated : Mar 20, 2021, 6:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.