ETV Bharat / state

सोन्या बेडकांच्या 'डराव डराव'ने तामजाईनगरात कल्लोळ - तामजाईनगर सोन्या बेडूकन्यूज

सामान्यतः भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांग्लादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, मालदीव, श्रीलंका या प्रदेशात आढळणारा हा बेडूक इतर बेडकांच्या तुलनेने मोठा, भारी व वजनदार असून त्यावरूनच त्याला इंग्रजीत 'बुलफ्रॉग' म्हणतात. सोनेरी रंगामुळे मराठीत सोन्या बेडूक म्हणून ओळखले जाते. गोड्या पाण्याच्या पाणथळ जागा, नद्या, तलाव, ओढे, डबकी यांसारख्या ठिकाणी हा आढळून येतो.

bullfrog found in tamjai nagar at satara
सोन्या बेडकांच्या 'डराव डराव'ने तामजाईनगरात कल्लोळ
author img

By

Published : Jun 17, 2021, 8:27 PM IST

सातारा - गडद पिवळ्या रंगाचा बेडूक म्हणजे कोणत्याही रासायनीक प्रदूषणाचा परिणाम नसून निसर्गत: या रंगाचे बेडूक पहायला मिळतात. पर्जन्यमानाचे द्योतक असणाऱ्या या सोन्या बेडकांचा (bullfrog) तामजाईनगर भागात 'डराव डराव'चा कल्लोळ ऐकायला मिळाला. मादी बेडकांना साद घालणाऱ्या त्यांच्या आवाजाने परिसरातील बघ्यांची गर्दी झाली आहे.

bullfrog found in tamjai nagar at satara

पर्जन्यमानाचे द्योतक

पावसाळा सुरू झाल्यानंतर अचानकपणे आपल्या आजुबाजूला या पिवळ्याधमक नर सोन्या बेडकांचा मादी बेडकांना साद घालणारा डराव डरावचा आवाज कानी येतो. अक्षरशः झुंडीने हे बेडूक साठलेल्या नाल्या, डबक्यांच्या कडेला दिसून येतात. तामजाईनगरमध्ये या बेडकांनी दर्शन दिले आहे. खरे तर हा त्यानंतर येणाऱ्या चांगल्या पावसाचा किंवा सलग पाऊस चालू राहील याचे द्योतक मानले जाते. मादी बेडकांनी अंडी दिल्यानंतर त्यातून प्रौढ बेडूक तयार होईपर्यंत निरंतर पाऊस सुरू राहणार, असे मानले जाते.

मानवासाठी बेडूक सहाय्यभूत

मानवासाठी बेडूक अनेक दृष्ट्या सहाय्यभूत ठरला आहे. तो कीटकभक्षी असल्याने उपद्रवी कीटकांची संख्या आटोक्यात राहते. नव्या औषधांची चाचणी घेण्यासाठी वैद्यकशास्त्रात त्यांचा वापर करतात. मात्र प्रदूषण, अधिवास क्षेत्राचा ऱ्हास, इत्यादी कारणांनी बेडकांच्या संख्येत घट झाल्याचे १९८० नंतर झालेल्या संशोधनांतून आढळून आले आहे. तर, जागतिक तापमान वाढीमुळे बेडकांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम झाल्याचेही दिसून आले आहे. ज्या परिसरात बेडकांची संख्या अधिक असते ते पर्यावरण निरोगी असते, असे वैज्ञानिकांचे मत आहे.

सोनेरी रंगामुळे सोन्या बेडूकाची ओळख

प्राणी अभ्यासक सागर कुलकर्णी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले कि, सामान्यतः भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांग्लादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, मालदीव, श्रीलंका या प्रदेशात आढळणारा हा बेडूक इतर बेडकांच्या तुलनेने मोठा, भारी व वजनदार असून त्यावरूनच त्याला इंग्रजीत 'बुलफ्रॉग' म्हणतात. सोनेरी रंगामुळे मराठीत सोन्या बेडूक म्हणून ओळखले जाते. गोड्या पाण्याच्या पाणथळ जागा, नद्या, तलाव, ओढे, डबकी यांसारख्या ठिकाणी हा आढळून येतो. परंतु उथळ पाण्याच्या डबक्यांना हा प्राधान्य देतो. त्यामुळे उघडे रानमाळ, नागरी वस्त्यांच्या कडेला साठलेल्या पाण्यात तो सहजासहजी दिसून येतो."

मादीला आकर्षित करण्यासाठी 'डराव डराव'

नर बेडूक हा मादीपेक्षा लहान असून त्याचा रंग मादीपेक्षा पिवळा आणि गडद असतो. नराच्या खालच्या जबड्याच्या त्वचेमध्ये मागील बाजूस सैल त्वचेच्या पिशव्या (स्वरकोश) असून मादीला मीलन फुगवटे आणि स्वरकोश नसतात. श्वसन संस्थेतील स्वरयंत्रामुळे नर मीलन काळात 'डराव डराव' असा आवाज काढतात. नरात असलेल्या स्वरकोशामुळे आवाजाचे ध्वनिवर्धन होते. नर हा मादी बेडकास आकर्षित करण्यासाठी त्याचा वापर करतात व प्रजनन पूर्ण करतात. प्रजनन झाल्यानंतर मादी उथळ डबक्यांमध्ये अंडी घालते, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी दिली.

हेही वाचा - उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवले जातील - अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.