सातारा - माण तालुक्यातील दहिवडीमध्ये एक बैल 30 ते 35 फूट खोल विहिरीमध्ये पाण्यामध्ये पडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मोकाट जनावरे अन्नाच्या शोधात वाड्या- वस्त्यांमध्ये शिरली असता त्यातील एक बैल विहिरीत पडला.
हेही वाचा - बुलंदशहर : १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 4 अल्पवयीन मुलांना अटक
स्थानिक नागरिकांनी याची माहिती नगरपंचायतीला दिल्यानंतर काही वेळानंतर नगरसेवक रमेश जाधव आणि स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने रस्ता तयार केला. सायंकाळची वेळ असल्याने याठिकाणी लाईटची सोय करण्यात आली. विहिरीतील पाण्याची पातळी 30 ते 35 फूट असल्याने त्याठिकाणी जाणे अडचणीचे ठरत होते. नागरिकांनी विहिरीमध्ये उतरून बैलाला पट्ट्याच्या सहाय्याने बांधले, पण काही वेळातच बैल पाण्यात दुसऱ्या बाजूला गेला. त्यामुळे पुन्हा दोन ते अडीच तास कसरत करावी लागली. शेवटी क्रेन मालकाने पाण्यात उतरून रात्री अकराच्या सुमारास बैलाला दोन ठिकाणी पट्टा बांधला आणि क्रेनच्या सहाय्याने बैलाला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तब्बल सहा तासाच्या प्रयत्नांनंतर बैलाला विहिरीमधून बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा - उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू, अखिलेश यादव यांचे धरणे आंदोलन
नगरपंचायतीत आपत्कालीन यंत्रणा नसल्याने स्थानिक आणि नगरपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष देवा देवकुळे, पिसाळ यांना जीव धोक्यात घालून बैलाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच वेळी बैलाने दोन ते तीन वेळा पिसाळ यांना शिंगाने मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. काही वेळानंतर महेश भुजबळ या क्रेन मालकाने पाण्यात उतरून बेल्ट बैलाला पुन्हा बांधला. त्यामुळे बैलाला पाण्यातून बाहेर काढण्यास मदत झाली. यावेळी आपत्कालीन यंत्रणा असणे गरजेचे होते मात्र नगरपंचायतीकडे ही यंत्रणा नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.
हेही वाचा - चुनाभट्टी येथे मद्यधुंद कार चालकाची पादचाऱ्यांना धडक; 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू
दहिवडी शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे नागरिक देखील हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळी ही मोकाट जनावरे उभ्या पिकांची नासाडी करत आहेत. तरी देखील मुख्याधिकारी आणि अधिक्षक यांचे याकडे लक्ष नसल्याने लाखो रुपयांचे नुकसान शेतकरी वर्गाला सहन करावे लागत आहे. आठ दिवसात याचा बंदोबस्त केला नाही, तर मुख्याधिकारी यांना कक्षात डांबण्याचा इशारा देण्यात आला आहे.