ETV Bharat / state

वाई ब्राम्ह समाज मंडळाने गर्ल्स हायस्कूलची इमारत पाडली, विद्यार्थी रस्त्यावर

author img

By

Published : Feb 16, 2021, 10:34 PM IST

इमारत धोकादायक असल्याचे सांगत वाई येथील ब्राम्ह समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गर्ल्स हायस्कूलचे काही वर्ग पाडले, याप्रकरणी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतली आहे.

वाई ब्राम्ह समाज मंडळाने गर्ल्स हायस्कूलची इमारत पाडली, विद्यार्थी रस्त्यावर
वाई ब्राम्ह समाज मंडळाने गर्ल्स हायस्कूलची इमारत पाडली, विद्यार्थी रस्त्यावर

सातारा - इमारत धोकादायक असल्याचे सांगत वाई येथील ब्राम्ह समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गर्ल्स हायस्कूलचे काही वर्ग पाडले, याप्रकरणी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतली आहे.

इमारत धोकादायक ?

कोल्हापूरच्या ‍स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने वाई ब्राम्ह समाज मंडळाकडून रविवार पेठेतील बांधीव जागा भाडेतत्वावर घेतली आहे. या जागेत गर्ल्स हायस्कूल चालविले जाते. भाडेकरार अद्याप बाकी आहे. शासनाने १५ तारखेपासून सर्व शाळा, कॉलेजेस सुरू करण्यात यावेत असे जाहीर केले होते. दरम्यानच्या काळात ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस २० जानेवारी रोजी शाळेला मिळाली. त्यानंतर संस्थेस देखील अशाच प्रकारची नोटीस पाठवण्यात आली. त्यासंदर्भात संस्थेशी पत्रव्यवहार सुरु होता. मात्र याचदरम्यान शाळेचे साहित्य बाहेर काढून या हायस्कूलच्या काही खोल्या पाडण्यात आल्या.

शाळेचे लाखोंचे नुकसान

'मंडळाच्या अध्यक्षांना शाळेचे साहित्य बाहेर का काढताय' असे मुख्याध्यापकांनी विचारले असता तुम्ही यात पडू नका, तुम्हाला महागात पडेल असा दम त्यांना देण्यात आला. शनिवार, रविवार या दोन दिवसांत सुटीचा फायदा घेऊन, शाळेतील शैक्षणिक साहित्य बाहेर काढण्यात आले. साहित्य बाहेर काढून काही खोल्या देखील पाडण्यात आल्या, यामध्ये शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत संस्थेच्या सचिवांशी संपर्क साधला असता त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही असे प्रभारी मुख्याध्यापिका रेखा ठोंबर यांनी पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे.

मुख्याध्यापक, शिक्षकांनी दिला आंदोलनाचा इशारा

मंडळाच्या पदाधिका-यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शाळेने केली आहे. अन्यथा शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक सर्व मुलींसह रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.