ETV Bharat / state

शिवाजी विद्यापीठ दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करणार

जिल्ह्यातील कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात परीक्षा फी माफ करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठ
author img

By

Published : Feb 28, 2019, 11:51 PM IST

सातारा - जिल्ह्यातील कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात परीक्षा फी माफ करण्यात आली आहे. राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे विद्यापीठ व परीक्षा मंडळे यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची योजना शासनाने लागू केली होती. मात्र, याची अंमलबजावणी केली जात नव्हती. अनेक सामाजिक संघटना व पक्षांनी आवाज उठवताच विद्यापीठाला जाग आली आहे.

शिवाजी विद्यापीठ

दुष्काळसदृश भागातील ११ हजार ९३४ विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या परीक्षा शुल्काचे एकूण ६१ लाख ९२ हजार रुपये माफ झाले आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्याची प्रक्रिया लवकरच विद्यापीठाकडून सुरू केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित योजनेनुसार परीक्षा शुल्क माफ करण्याबाबतचे आदेश विद्यापीठाला नोव्हेंबरमध्ये प्राप्त झाले, त्यानुसार विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयाकडून दुष्काळसदृश्य गावातील विद्यार्थ्यांची नावे आणि माहिती मागवली आहे.

आतापर्यंत विद्यापीठाला जिल्ह्यातील ८० महाविद्यालयांनी माहिती सादर केली आहे. या माहितीनुसार एकूण ११ हजार ९३४ विद्यार्थ्यांची ६१ लाख ९२ हजार परीक्षा शुल्क माफ झाले आहे. याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने शासनाला सादर केला आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अजून काही महाविद्यालयांनी माहिती सादर केली नाही. या महाविद्यालयांशी विद्यापीठ प्रशासनाकडून संपर्क साधण्यात आला आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर शासनाकडून शुल्कमाफीचा आदेश देण्यात आला. त्याआधी विद्यापीठाने परीक्षा शुल्क आकारणी केली होती. त्यामुळे शासन आदेशानुसार शुल्क माफ झाल्याने त्यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शुल्क परत दिले जाणार आहे.

undefined

Intro:सातारा जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात परीक्षा फी माफ करण्यात आली आहे.
राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे विद्यापीठ व परीक्षा मंडळे यांचे परीक्षा शुल्क फी माफ करण्याची योजना शासनाने लागू केली होती. मात्र याची अंमलबजावणी केली जात नव्हती.
अनेक सामाजिक संघटना व पक्ष यांनी आवाज उठवताच विद्यापीठाला जाग आली आहे.
दुष्काळसद्श भागातील 11 हजार 934 विद्यार्थ्यांच्या ऑक्टोंबर 2018 मध्ये झालेल्या परीक्षा शुल्काचे एकूण 61 लाख 92 हजार रुपये माफ झाले आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्याची प्रक्रिया लवकरच विद्यापीठाकडून सुरू केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Body:संबंधित योजनेनुसार परीक्षा शुल्क माफ करण्याबाबतचे आदेश विद्यापीठाला नोव्हेंबरमध्ये प्राप्त झाले, त्यानुसार विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयाकडून दुष्काळसदृश्य गावातील विद्यार्थ्यांची नावे आणि माहिती मागवली आहे.
आतापर्यंत विद्यापीठाला तिने जिल्ह्यातील 80 महाविद्यालयांनी माहिती सादर केली आहे. या माहितीनुसार एकूण अकरा हजार 934 विद्यार्थ्यांची 61लाख 92 हजार इतके परीक्षा शुल्क माफ झाले आहे. याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने शासनाला सादर केला आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रतील अजून काही महाविद्यालयांनी माहिती सादर केली नाही ही या महाविद्यालयांशी विद्यापीठ प्रशासनाकडून संपर्क साधण्यात आला आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर शासनाकडून शुल्कमाफीचा आदेश देण्यात आला त्याआधी विद्यापीठाने परीक्षा शुल्क आकारणी केली होती. त्यामुळे शासन आदेशानुसार शुल्क माफ झाल्याने त्यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शुल्क परत दिले जाणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.