पंढरपूर (सोलापूर) - सातारा-पंढरपूर रस्त्यावरील पिलीव घाट परिसरात साताऱ्याहून सोलापूरला जाणाऱ्या एसटी बसवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली होती. त्या घटनेनंतर सोलापूर व सातारा जिल्हा पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशन सुरू केला आहे. तपासावेळी घटनास्थळाजवळ एक दुचाकी सापडल्याची माहिती, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके यांनी दिली आहे.
काय आहे प्रकार..?
सातारा-पंढरपूर रस्त्यावर पिलीव घाटात मंगळवारी (दि. 19 जाने.) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात लोकांनी अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये 4 ते 5 वाहनांच्या काचा फुटल्या असून वाहनांचे नुकसान झाले होते. तसेच या दगडफेकीत बस जवळून जाणाऱ्या एका दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
पोलिसांकडून पंढरपूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत
या घटनेची माहिती मिळताच पिलीव परिक्षेत्र पोलीस ठाण्याचे कर्मचारी कर्मचाऱ्यांनी दगडफेक झालेल्या घाटात जाऊन पाहणी केली होती. पंढरपूर-सातारा या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी खोळंबली होती. पोलिसांच्या मदतीने ती पूर्ववत करण्यात आली आहे.
हेही वाचा - पिलीव घाटात लुटमारीच्या उद्देशाने वाहनांवर दगडफेक; कोंबिंग ऑपरेशन लवकरच