ETV Bharat / state

कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटलांचा पाचव्यांदा विजय - maharashtra vidhansabha result

पाटील यांना 99 हजार 899 मते मिळाली. अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांना 51 हजार 43 मिळाली. तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले.

बाळासाहेब पाटलांचा पाचव्यांदा विजय
author img

By

Published : Oct 25, 2019, 4:32 AM IST

सातारा - कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी सलग पाचव्यांदा विजय मिळवला आहे. पाटील हे संयमी नेते म्हणून राष्ट्रवादीत परिचित आहेत. तिरंगी लढतीत ते 48 हजार 856 मतांनी विजयी झाले.

2014 च्या निवडणुकीत सगळे पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम अशी तिरंगी लढत झाली होती. अशातही पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. या निवडणुकीत त्यांच्यासमोर तेच उमेदवार होते. फक्त त्यांनी पक्ष बदललेले. मनोज घोरपडे अपक्ष आणि धैर्यशील कदम महायुतीचे उमेदवार म्हणून पाटील यांच्यासमोर होते. त्यातही राजकीय तिढा होता. घोरपडे यांना चंद्रकांतदादांनी भाजपचे उमेदवार म्हणून पुढे आणले होते. परंतु, युतीच्या फॉर्म्युल्यानुसार कराड उत्तरची जागा शिवसेनेकडे गेली. मग धैर्यशील कदमांनी हातावर शिवबंधन बांधून सेनेची उमेदवारी घेतली. तरीही बाळासाहेब पाटील यांना काही फरक पडला नाही. उलट मागील निवडणुकीपेक्षा ते अधिक मतांनी विजयी झाले.

पाटील यांना 99 हजार 899 मते मिळाली. अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांना 51 हजार 43 मिळाली. तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. तिरंगी लढतीत आ. बाळासाहेब पाटील यांचा 48 हजार 856 मतांनी विजय झाला. ते सलग पाचव्यांदा विजयी झाले असून कराड उत्तरच्या राजकारणातील त्यांचा हा विक्रमी विजय आहे.

Intro:कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांनी सलग पाचव्यांदा विजय मिळविला. त्यांनी आजअखेर स्व. यशवंतरावांचे विचार जपले. तसेच वडील माजी आ. स्व. पी. डी. पाटील यांचा वारसा जपला. त्याचे हे यश मानले जात आहे. आ. पाटील हे संयमी नेते म्हणून राष्ट्रवादीत परिचित आहेत. तिरंगी लढतीत ते 48 हजार 856 मतांनी विजयी झाले.Body:कराड (सातारा) - कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांनी सलग पाचव्यांदा विजय मिळविला. त्यांनी आजअखेर स्व. यशवंतरावांचे विचार जपले. तसेच वडील माजी आ. स्व. पी. डी. पाटील यांचा वारसा जपला. त्याचे हे यश मानले जात आहे. आ. पाटील हे संयमी नेते म्हणून राष्ट्रवादीत परिचित आहेत. तिरंगी लढतीत ते 48 हजार 856 मतांनी विजयी झाले.
   स्व. यशवंतराव चव्हाण यांनी कराड तालुक्यावर राजकीय संस्कार केले. त्यांच्या पश्चात स्व. पी. डी. पाटील यांनी यशवंतरावांचा वारसा समर्थपणे जपला. त्याच वाटेवर चालत आ. बाळासाहेब पाटीलही गेली 20 वर्षे कराड उत्तरमध्ये कार्यरत होते. संयमी नेतृत्व म्हणून त्यांचा लौकीक आहे. विरोधकांनी कितीही टीका केली, तरी ते त्याला संयमाने प्रत्त्युत्तर देतात. त्यातून त्यांच्यावरील राजकीय संस्कार अधोरेखित होतात. विकासकामांमध्ये ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे विरोधकांना या मतदार संघात फारसा वाव नसतो. 2014 च्या निवडणुकीत सगळे पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी आ. बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम अशी तिरंगी लढत झाली होती. तरीही आ. पाटील यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला होता. या निवडणुकीत त्यांच्यासमोर तेच उमेदवार होते. फक्त त्यांनी पक्ष बदललेले. मनोज घोरपडे अपक्ष आणि धैर्यशील कदम महायुतीचे उमेदवार म्हणून आ. पाटील यांच्यासमोर होते. त्यातही राजकीय तिढा होता. घोरपडे यांना चंद्रकांतदादांनी भाजपचे उमेदवार म्हणून पुढे आणले होते. परंतु, युतीच्या फॉर्म्युल्यानुसार कराड उत्तरची जागा शिवसेनेकडे गेली. मग धैर्यशील कदमांनी हातावर शिवबंधन बांधून सेनेची उमेदवारी घेतली. तरीही आ. बाळासाहेब पाटील यांना काही फरक पडला नाही. उलट मागील निवडणुकीपेक्षा ते अधिक मतांनी विजयी झाले. आ. पाटील यांना 99 हजार 899 मते मिळाली. अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांना 51 हजार 43 मिळाली. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. तिरंगी लढतीत आ. बाळासाहेब पाटील यांचा 48 हजार 856 मतांनी विजय झाला. ते सलग पाचव्यांदा विजयी झाले असून कराड उत्तरच्या राजकारणातील त्यांचा हा विक्रमी विजय आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.