ETV Bharat / state

क्रांती अग्रणी जी. डी. लाड यांच्या जन्मदिनी मुलाला मिळाली आमदारकी - satara arun lad news

क्रांती अग्रणी जी. डी. लाड यांच्या जन्मदिनी त्यांचे सुपुत्र अरूण लाड हे आमदार झाल्याने, ही त्यांना अनोखी श्रद्धांजली ठरली आहे.

arun-lad-won-election-on-birth-anniversary-day-of-revolutionary-leader-gd-lad-in-satara
क्रांती अग्रणी जी.डी.लाड यांच्या जन्मदिनी मुलाला मिळाली आमदारकी
author img

By

Published : Dec 6, 2020, 5:19 PM IST

कराड (सातारा) - अरूण लाड यांना महाविकास आघाडीने पुणे पदवीधर मतदार संघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत अरूण लाड यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला. क्रांती अग्रणी जी. डी. लाड यांच्या जन्मदिनी त्यांचे सुपुत्र अरूण लाड हे आमदार झाल्याने ही त्यांना अनोखी श्रद्धांजली ठरली आहे.

कोण आहे जी. डी. लाड -

जी. डी. लाड यांचा जन्म कुंडल (जि. सांगली) येथे ४ डिसेंबर १९२२रोजी झाला होता. देशात ब्रिटिश सत्ता असताना सातारा आणि सांगली या संयुक्त सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार होते. स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या तुफानी दलाचे ते फील्ड मार्शल होते. पुण्यात आयुर्वेदाचे शिक्षण सोडून ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. तासगाव येथे युनियन जॅक उतरवून त्याजागी तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. आंदोलनाचा खर्च आणि हत्यारे खरेदीसाठी त्यांनी शेणोली (ता. कराड) आणि धुळे येथे रेल्वेगाडी लुटली होती. पुढे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली प्रतिसरकार चळवळीचे सेनापतिपद त्यांना मिळाले होते.

हेही वाचा - महिलेला समाजातून बहिष्कृत करणाऱ्या जातपंचायतीच्या सात पंचांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.