कराड (सातारा) - कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांची आज सातार्याला बदली झाली. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी त्यांची एलसीबीच्या पोलीस निरीक्षपदी नियुक्ती केली आहे. धुमाळ यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी एलसीबीला मिळाल्यामुळे एलसीबीच्या कामगिरीचा आलेख चढता राहील, असा विश्वास जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्यांनी व्यक्त केला आहे.
संयमाने तपास करणारा अधीकारी-
किशोर धुमाळ यांची 2017 ला शाहूपुरी पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. त्यावेळी सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासह मोठा परिसर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झाला होता. 2017 ते 2019 या दोन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 6 खुनाच्या गुन्ह्यांची उकल केली होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निवासस्थान असलेल्या 'सुरूची' बंगल्याच्या परिसरात दोन राजकीय गटात मोठा राडा झाला होता. त्याचाही धुमाळ यांनी अत्यंत संयमाने तपास केला होता.
कराडसारख्या प्रगतशील तालुक्यात चांगले काम-
2019 ला त्यांची बदली कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली होती. कराडसारख्या प्रगतशील तालुक्यात त्यांनी चांगले काम केले. कराड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे उघडकीस आणून संशयीतांना जेरबंद केले. बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्या संशयीतांच्याही त्यांनी मुसक्या आवळल्या.
एलसीबीचे पोलीस निरीक्षकपद गेली काही दिवस होते रिक्त-
एलसीबीचे पोलीस निरीक्षकपद गेली काही दिवस रिक्त होते. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नावाची एलसीबीच्या निरीक्षकपदासाठी चर्चा होती. परंतु, कौटुंबिक कारणामुळे त्यांनी नकार दिला. त्यानंतर कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांची जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी नियुक्ती केली.
हेही वाचा- सातारा : ट्रॅक्टरखाली येऊन एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू
हेही वाचा- तेलंगणामध्ये कॉंग्रेसला धक्का ; 'हा' मोठा नेता भाजपात