ETV Bharat / state

साताऱ्यातील माण-खटाव मतदारसंघात युतीत बिघाडी - bjp satara

सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघात युतीत बिघाडी झाली आहे. राज्यात भाजप आणि सेना एकत्र लढत असताना माण-खटाव मतदारसंघात मात्र, भाजप आणि शिवसेना यांनी एकमेकांच्या विरोधात शड्डु ठोकला आहे.

माण-खटाव
author img

By

Published : Oct 2, 2019, 5:22 PM IST

सातारा- राज्यात भाजप आणि शिवसेनेत युती झाली आहे. मात्र, या युतीमुळे काही ठिकाणी शिवसेनेच्या हक्काच्या मतदारसंघांतील उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे बंडखोरीचे प्रमाण वाढणार आहे. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघातही युतीत बिघाडी झाली आहे.

एकीकडे राज्यात भाजप आणि सेना एकत्र लढत असताना माण-खटाव मतदारसंघात मात्र, भाजप आणि शिवसेना यांनी एकमेकांच्या विरोधात शड्डु ठोकला आहे. वास्तविक बघता हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मदतीने माजी आमदार जयकुमार गोरे यांनी हा मतदारसंघ भाजपकडे खेचुन घेतला. त्यामुळे शिवसेना नेते शेखर गोरे चांगलेच संतप्त झाले आहेत. तर भाजपचे माजी आमदार दिलीपराव यळगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी देखील वेगळी चूल मांडली आहे. अचानकपणे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार जयकुमार गोरे यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

शेखर गोरे हे ४ ऑक्टोबरला निवडणूक अर्ज भरणार आहेत. मात्र, शेखर गोरेंनी त्यांच्या जाहिरातीवर शिवसेनेचे चिन्ह वापरत खळबळ उडवून दिली आहे. या निर्माण झालेल्या पेचात दोन्हीपक्ष कसा मार्ग काढणार हे बघावे लागणार आहे.

कोण आहेत शेखर गोरे-
1) माजी आमदार जयकुमार गोरे यांचे छोटे बंधू
2) 2014 मध्ये माण-खटाव विधानसभा मतदारसंघात 52000 मते घेतली आहेत.
3) राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2016ला सांगली- सातारा विधानपरिषद लढवली होती.
4) म्हसवड नगरपालिकेवरही सत्ता
5) बाजार समिती माण, खरेदी विक्री सांघात बरोबरीत सत्ता सोडवली आहे.
6) फलटण येथील शरद पवार यांच्या सभेत राडा प्रकरणी राज्यभर चर्चित

Intro:सातारा राज्यात भाजपा आणि शिवसेनेत युती झाली आहे. मात्र या युतीमुळे काही मतदारसंघात शिवसेनेच्या हक्काच्या मतदारसंघात उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे बंडखोरीचं प्रमाण वाढणार आहे. सातारा जिल्ह्यातील माण- खटाव मतदारसंघात युतीत बिघाडी झाली आहे. एकीकडे राज्यात भाजपा आणि सेना एकत्र लढताना पहायला मिळतीये मात्र माण-खटाव मतदारसंघात भाजपा आणि शिवसेना यांनी एकमेकांच्या विरोधात शड्डु ठोकला आहे. वास्तविक पहायला गेलं तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या होता मात्र मुख्यमंत्र्यांच्या मदतीने माजी आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपाकडे खेचुन घेतला त्यामुळे शिवसेना नेते शेखर गोरे चांगलेच संतप्त झाले आहेत. तर भाजपचे माजी आमदार दिलीपराव यळगावकर, भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष अनिल देसाई यांनी देखील वेगळी चूल मांडली आहे. अचानकपणे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार जयकुमार गोरे यांनी राजनीम देऊन भाजपात प्रवेश केला त्यामुळे स्थानिक नेत्यांनी भाजपाला वाटण्याच्या अक्षदा दिल्या आहेत.

Body:शेखर गोरे हे ४ आॅक्टोबर ला निवडणुक अर्ज भरणार आहेत. मात्र त्यांच्या जाहिरातीवर शेखर गोरेंनी शिवसेनेचं चिन्ह वापरत खळबळ उडवुन दिली आहे. यामुळे राज्यात युती माण-खटाव मध्ये मात्र सवता सुभा असंच म्हणावं लागणार आहे. या निर्माण झालेल्या पेचात दोन्ही पक्ष कसा मार्ग काढणार हे पहावे लागणार आहे.

कोण आहेत शेखर गोरे:-
1)माजी आमदार जयकुमार गोरे यांचे छोटे बंधू
2)2014 मध्ये माण खटाव विधानसभा मतदारसंघात 52000 मते घेतली आहेत.
3)राष्ट्रवादी काँग्रेस मधून2016 ला सांगली सातारा विधानपरिषद लढवली होते.
4)स्थानिक स्वराज्य संस्था 60%पेक्षा जास्ती सत्ते मध्ये अन्यात त्यांचा वाट
5)म्हसवड नगरपालिका वरती देखील सत्त
6)बाजार समिती माण, खरेदी विक्री सांघात बरोबरीत सत्ता सोडवली आहे.
7)फलटण येथील शरद पवार यांच्या सभेत राडा प्रकरणी राज्यभर चर्चित
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.