ETV Bharat / state

कराड : 'झाले इलेक्शन, जपा रिलेशन..!', सर्वपक्षीय नेत्यांचे आवाहन - प्रीतीसंगम

संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी अशी कराडची ओळख आहे. निवडणुकीनंतर सामाजिक एकता जपण्याच्या उपक्रमाद्वारे पुन्हा राज्याला नवी दिशा देण्याचा कराडकरांनी स्तुत्य प्रयत्न केला आहे.

कराडमधील स्तुत्य उपक्रम
author img

By

Published : Oct 23, 2019, 11:50 PM IST

सातारा - लोकसभा पोटनिवडणूक आणि कराड दक्षिण विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर विविध राजकीय नेते-कार्यकर्ते सामाजिक सलोख्यासाठी कराडमध्ये एकटवले आहेत. निवडणूक (इलेक्शन) झाली आहे. आता सर्वांनी संबंध (रिलेशन) जपावे, असे आवाहन विविध मान्यवरांनी प्रीतीसंगम येथील बागेत नागरिकांना केले.

कराडमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी, विद्यमान आणि माजी नगरसेवक व नागरिक यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रीतिसंगमावरील बागेत मंगळवारी एकत्र आले. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन कराडचा लौकीक आणि सामाजिक एकात्मता जपावी, असे यावेळी आवाहन नागरिकांना करण्यात आले.

संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी अशी कराडची ओळख आहे. निवडणुकीनंतर सामाजिक एकता जपण्याच्या उपक्रमाद्वारे पुन्हा राज्याला नवी दिशा देण्याचा कराडकरांनी स्तुत्य प्रयत्न केला आहे. यशवंतराव यांचे विचार जपत राजकारण, समाजकारण केलेले आमदार पी. डी. पाटील यांचे नातू आणि कराडचे नगरसेवक सौरभ पाटील यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

हेही वाचा-चंद्रकांत पाटील यांनी गायलं कोळी गीत...पाहा व्हिडिओ

यावेळी कराडचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विजय वाटेगावकर, फारूख पटवेकर, अतुल शिंदे, विजय मुठेकर, मलकापूरचे माजी नगरसेवक दादा शिंगण उपस्थित होते. त्याचबरोबर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रमोद तोडकर, प्रतापराव साळुंखे दिलीपराव घोडके, प्रकाश जाधव, प्रमोद पाटील हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रीतिसंगमावरील बैठकीत कराडचा लौकीक आणि घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांना उजाळा दिला.

हेही वाचा-धक्कादायक! मतदान प्रक्रियेतील कर्मचारीच लोकशाहीच्या हक्कापासून राहिले वंचित

निवडणुकीनंतर होणार्‍या वादामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येते. कायदा, सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जोपासत सर्व कराडकरांनी चांगल्या विचारांना साथ देण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

Intro:सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर कराडमधील सर्व पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, विद्यमान आणि माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरीक मंगळवारी स्व. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रीतिसंगमावरील बागेत एकत्र आले. इलेक्शन झाले आहे. आता सर्वांनी रिलेशन जपावे. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन कराडचा लौकीक आणि सामाजिक एकात्मता जपावी. कायदा, सुव्यवस्था कायम राखावे, असे आवाहन समस्त नागरीकांना केले. Body:
 कराड (सातारा) - सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर कराडमधील सर्व पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, विद्यमान आणि माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरीक मंगळवारी स्व. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रीतिसंगमावरील बागेत एकत्र आले. इलेक्शन झाले आहे. आता सर्वांनी रिलेशन जपावे. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन कराडचा लौकीक आणि सामाजिक एकात्मता जपावी. कायदा, सुव्यवस्था कायम राखावे, असे आवाहन समस्त नागरीकांना केले. 
   संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराडकरांनी या उपक्रमाद्वारे पुन्हा राज्याला नवी दिशा देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. हयातभर स्व. चव्हाणसाहेबांचे विचार जपत राजकारण, समाजकारण केलेल्या माजी आ. स्व. पी. डी. पाटील यांचे नातू आणि कराडचे नगरसेवक सौरभ पाटील यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
   कराडचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विजय वाटेगावकर, फारूख पटवेकर, अतुल शिंदे, विजय मुठेकर, मलकापूरचे माजी नगरसेवक दादा शिंगण, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रमोद तोडकर, प्रतापराव साळुंखे, दिलीपराव घोडके, प्रकाश जाधव, प्रमोद पाटील यांनी या प्रीतिसंगमावरील बैठकीत कराडचा लौकीक आणि आजपर्यंतच्या उपक्रमांना उजाळा दिला. निवडणुकीनंतर होणार्‍या वादामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येते. कायदा, सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जोपासत सर्व कराडकरांनी शहराचा लौकीक जपावा. नागरीकांनी विकासाला आणि चांगल्या विचारांना साथ देण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.