ETV Bharat / state

कराड-तासगाव मार्गावर गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त; एकास अटक, दोघे फरार

author img

By

Published : Feb 2, 2020, 9:18 AM IST

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कराड-तासगाव मार्गावर कार्वे येथे गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त केला. यावेळी टेम्पो आणि दारूसाठा मिळून 6 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Alcohol seized in Satara
गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

सातारा : कराड-तासगाव मार्गावर कार्वे येथे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त केला. या ठिकाणी एका टेम्पोची तपासणी करून टेम्पोतून वाहतूक करण्यात येत असलेली दारू आणि टेम्पो असा एकूण 6 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून 2 जण फरार आहेत.

सदानंद दत्तत्रय यादव (रा. घोटी, ता. माढा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर गणेश शेळके (रा. बेंबळे, ता. माढा, जि. सोलापूर) आणि जयवंत पाटील (रा. कार्वे नाका, ता. कराड) हे दोघे घटनास्थळावरून पळून गेले आहेत. त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-तासगाव मार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती खबर्‍यामार्फत कराड उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार, संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी अशोक लेलँड कंपनीचा एका टेम्पोचा संशय आल्याने टेम्पोची तपासणी केली असता, टेम्पोत गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांच्या दारूचे बॉक्स आढळून आले. त्यावेळी तीनपैकी दोघे जण पळून गेले.

टेम्पोमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे 50 बॉक्स म्हणजेच 2 हजार 500 बाटल्या होत्या. टेम्पो आणि दारूसाठा मिळून 6 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यात कराड उत्पादन शुल्क विभागाने केलेली ही चौथी मोठी कारवाई आहे. कराड विभागाचे निरीक्षक राजेंद्र पाटील, दुय्यम निरीक्षक शिरीष जंगम, प्रताप बोडेकर, रोहित माने, श्रीनिवास पाटील, सचिन बावकर, जवान प्रशांत गायकवाड, विनोद बनसोडे, शंकर बक्केवाड आणि राणी काळोखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Intro:कराड उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज (शनिवारी) कराड-तासगाव मार्गावर कार्वे (ता. कराड) येथे अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोची तपासणी करून टेम्पोतून वाहतूक करण्यात येत असलेल्या गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा आणि टेम्पो, असा 6 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून दोन जण फरारी झाले आहेत. Body:
कराड (सातारा) - कराड उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज (शनिवारी) कराड-तासगाव मार्गावर कार्वे (ता. कराड) येथे अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोची तपासणी करून टेम्पोतून वाहतूक करण्यात येत असलेल्या गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा आणि टेम्पो, असा 6 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून दोन जण फरारी झाले आहेत. 
    सदानंद दत्तत्रय यादव (रा. घोटी, ता. माढा, जि. सोलापूर) हा उत्पादन शुल्क पथकाच्या हाती लागला. त्याला अटक करण्यात आली आहे, तर गणेश शेळके (रा. बेंबळे, ता. माढा, जि. सोलापूर) आणि जयवंत पाटील (रा. कार्वे नाका, ता. कराड) हे दोघे घटनास्थळावरून पळून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. कराड-तासगाव मार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती खबर्‍यामार्फत कराड उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येत होती. अशोक लेलँड कंपनीचा एक टेम्पोंचा संशय आल्याने टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोत गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांच्या दारूची बॉक्स आढळून आली. त्याचवेळी तीनपैकी दोघे जण पळून गेले. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एका संशयीतास अटक केली. 
  टेम्पोमध्ये गोवा बनावटीच्या दारूची 50 बॉक्स म्हणजेच 2 हजार 500 बाटल्या होत्या. टेम्पो आणि दारूसाठा मिळून 6 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या दोन महिन्यात कराड उत्पादन शुल्क विभागाने केलेली ही चौथी मोठी कारवाई आहे. कराड विभागाचे निरीक्षक राजेंद्र पाटील, दुय्यम निरीक्षक शिरीष जंगम, प्रताप बोडेकर, रोहित माने, श्रीनिवास पाटील, सचिन बावकर, जवान प्रशांत गायकवाड, विनोद बनसोडे, शंकर बक्केवाड आणि राणी काळोखे यांच्या पथकाने ही कारवाई केली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.