ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 18'मध्ये सलमान खानच्या क्लॉसनंतर अश्नीर ग्रोव्हरची प्रतिक्रिया, वाचा पोस्ट - SALMAN KHAN AND ASHNEER GROVER

'बिग बॉस 18'मध्ये अश्नीर ग्रोव्हरनं सलमान खानबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं एक नोट लिहिली आहे.

ashneer grover
अश्नीर ग्रोव्हर (अश्नीर ग्रोवर आणि सलमान खान (ETV Bharat/IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 19, 2024, 12:16 PM IST

मुंबई - 'शार्क टँक इंडिया'चे माजी जज अश्नीर ग्रोव्हर सलमान खानचा शो 'बिग बॉस 18'च्या वीकेंड का वारमध्ये दिसला. यावेळी सलमान खाननं अश्नीर ग्रोव्हरला त्याच्या कडक शब्दांची आठवण करून दिली. अश्नीरनं यापूर्वी सलमान खानबद्दल एक विधान केलं होत. एका इव्हेंटमध्ये अश्नीरनं सांगितलं होतं, "आम्हाला भारत पेची जाहिरात करायची होती, माझ्याकडे 100 कोटी रुपये होते आणि जाहिरातीची किंमत 20 कोटी रुपये होती, या जाहिरातीसाठी सलमान खाननं 7.50 कोटी रुपये मागितले होते. यानंतर मी त्याच्या मॅनेजरला पैसे थोडे कमी करण्यास सांगितले, यानंतर सलमान खान हा 4.50 कोटीवर आला. याबद्दल अश्नीरनं खूप उद्धटपणे सलमानबद्दल ही गोष्ट प्रगट केली होती.

सलमान खाननं घेतली अश्नीर ग्रोव्हरची क्लॉस: अश्नीरनं 2019मध्ये सलमान खानला भारत पेच्या जाहिरातीसाठी कॉल केला होता. आता जेव्हा अश्नीर 'बिग बॉस 18'मध्ये सलमानच्या समोरासमोर आला, तेव्हा त्यानं त्याचे स्टारडम पाहिले आणि तो थोडा घाबरला. 'बिग बॉस 18'मध्ये सलमान खाननं अश्नीरला त्याची बोलण्याची पद्धत आणि वृत्ती खराब असल्याचं शोदरम्यान म्हटलं. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अश्नीर हा सलमासमोर एका ओल्या मांजराप्रमाणे उभा असल्याचा दिसत आहे. या व्हिडिओच्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

अश्नीर ग्रोव्हरनं शेअर केली पोस्ट : शोमध्ये अश्नीरनं या कृत्याबद्दल सलमान खानची माफी मागितली. आता त्यानं त्याच्या एक्स पोस्टमध्ये स्वतःचा बचाव करताना लिहिलं, 'मला आशा आहे की तुम्ही 'बिग बॉस 18'च्या वीकेंड का वारचा खूप आनंद घेत असणार, माझ्याकडे खूप काही होते. मला खात्री आहे की, या शोची टीआरपी गगनाला भिडेली असेल. यानंतर, या पोस्टमध्ये त्यानं सलमान खानच्या कौतुक केलं. या पोस्टमध्ये त्यानं पुढं लिहिलं, 'सलमान खान एक उत्तम होस्ट आणि अभिनेता आहे, सलमानला माहित आहे की, बिग बॉसमध्ये कुठली गोष्ट चांगली चालते, मी नेहमीच सलमान खानच्या सेंस आणि बिजनेस पद्धतीचे कौतुक केले आहे, मी फक्त एकदा त्याच्याबद्दल काहीतरी चुकीचे बोललो होतो, ते चुकीचं होतं. माझी डील नेहमीच बरोबर असते. मला 2019मध्ये सलमानबरोबर एक फोटो पाहिजे होता, पण तो मिळाला नाही. आता मला त्याच्याबरोबर 'बिग बॉस 18'च्या सेटवर ही संधी मिळाली, धन्यवाद सलमान खान असाच धमाका करत राहा.' आता अश्नीरच्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा :

  1. शाहरुख सलमान स्टारर 'करण अर्जुन'च्या ट्रेलरसाठी हृतिक रोशननं दिला आवाज, व्हिडिओ झाला व्हायरल
  2. सलमान खानला धमकी दिल्याप्रकरण सॉन्ग राइटरला कर्नाटकातून अटक, वाचा सविस्तर
  3. वरुण धवन स्टारर 'बेबी जॉन'मध्ये सलमान खान करणार कॅमिओ, झाला खुलासा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.