ऑकलॅंड Longest Duck in Test Cricket : जर एखाद्या खेळाडूनं सामन्यात 12 पेक्षा जास्त षटकं खेळली आणि क्रिझवर 101 मिनिटं घालवूनही तो खातं न उघडता बाद झाला, तर त्या फलंदाजावर किती टीका होईल, यात आश्चर्य वाटायला नको. पण हे सर्व करणारा खेळाडू आपल्या कामगिरीच्या जोरावर देशासाठी हिरो ठरला तर नवल वाटणं रास्त आहे. ही स्वप्नवत घटना प्रत्यक्षातही आली होती सुमारे 25 वर्षांपूर्वी. हा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डॅरिल क्युलिनननं 275 धावांची खेळी खेळली, पण सामन्यात निर्णायक खेळी जेफ ॲलॉटनं केली आणि तेही एकही धाव न काढता. नेमकं त्या सामन्यात काय झालं ते जाणून घेऊया..
Slowest Test innings (50+ balls) 🏏
— ꜱᴘᴏʀᴛꜱ ꜱᴛᴀᴛꜱ ᴀɴᴀʟʏꜱᴛ 🇮🇳 (@_mkverma) July 29, 2023
Rns Bls SR Player
0 77 0.0 Geoff Allott 🇳🇿 1999
5 85 5.95 Mansoor Ali Khan 🇮🇳 1973
7 101 6.93 Geoff Miller 🏴 1979
6 77 7.79 Stuart Broad 🏴 2013
9 97 9.37 Rajesh Chauhan 🇮🇳 1994
(1/2) pic.twitter.com/An9KOG3PIb
कधी झाला होता सामना : वास्तविक हा सामना 1999 मध्ये 27 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान खेळला गेला होता. ऑकलॅंडमध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 621 धावांवर पहिला डाव घोषित केला. यात क्युलिनननं सर्वाधिक नाबाद 275 धावा केल्या, तर गॅरी कर्स्टननंही 128 धावांचं योगदान दिलं. जॉन्टी रोड्सनं 63 धावांची खेळी केली तर शॉन पोलॉकनंही 69 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ख्रिस हॅरिसनं दोन बळी घेतले होते.
एकही धाव न काढता 11व्या क्रमांकावर फलंदाजी करत रचला इतिहास : यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडचा पहिला डाव 352 धावांवर आटोपला. मॅट हॉर्ननं सर्वाधिक 93 आणि ख्रिस हॅरिसनं नाबाद 68 धावा केल्या. पण हे दोघं इतिहासात खाली गेलेले खेळाडू नव्हते, तर एकही धाव न काढता करिष्मा करणारा फलंदाज होता 11व्या क्रमांकावर आलेला जेफ ॲलॉट. ॲलॉटनं ख्रिस हॅरिससोबत 27.2 षटकांत 32 धावांची भागीदारी केली. यात सर्व धावा हॅरिसच्या बॅटमधून आल्या. 77 चेंडू खेळल्यानंतर ॲलॉट जॅक कॅलिसच्या चेंडूवर पोलॉककडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. पण कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळून शून्य धावा करण्याचा त्याचा विश्वविक्रम आजही कायम आहे. मात्र, 101 मिनिटं क्रीजवर राहून शून्य धावा करण्याचा विक्रम जेम्स अँडरसननं मोडला, ज्यानं 103 मिनिटं क्रीजवर राहून शून्य धावा केल्या.
🔸 First to take 20 or more wickets in a single edition of the Men's @cricketworldcup
— ICC (@ICC) December 23, 2020
🔸 Once batted 101 minutes without scoring, the longest duck in a Test innings. It proved to be invaluable in helping 🇳🇿 draw the Test
Happy birthday to New Zealand fast bowler Geoff Allott! pic.twitter.com/jWaS9gBwBq
न्यूझीलंड पराभवापासून वाचला : आता फॉलोऑन खेळून डावाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न न्यूझीलंड करत होता. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून मॅट हॉर्ननं 60, रॉजर टूजनं 65 आणि नॅथन ॲस्टलनं नाबाद 69 धावा करुन संघाला पराभवापासून वाचवलं. पण या ड्रॉमध्ये सर्वात मोठं योगदान जेफ ॲलॉटनं 77 चेंडूत क्रीझवर घालवलेली 101 मिनिटं होती, ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला न्यूझीलंडला पुन्हा ऑलआउट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही. या कामगिरीनंतर जेफ ॲलॉटच्या कामगिरीचं न्यूझीलंडमध्ये खूप कौतुक झालं.
हेही वाचा :