ETV Bharat / state

Aaditya Thackeray in Patan : आदित्य ठाकरे उद्या शंभूराजेंच्या बालेकिल्ल्यात, शिवसंवाद यात्रेत बंडखोरांचा घेणार समाचार

आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेली शिवसंवाद यात्रा ( Shivsanvad Yatra in Patan constituency ) मंगळवारी (दि. 2 ऑगस्ट) बंडखोर आमदार शंभूराज देसाईंच्या पाटण विधानसभा मतदार संघात ( Aditya Thackerays meeting in MLA Shambhuraj Desais Patan constituency ) धडकणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे शंभूराज देसाईंच्या बंडाळीला कशा रीतीने प्रत्युत्तर देतात, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

author img

By

Published : Aug 1, 2022, 5:33 PM IST

Shiv Senas youth chief Aditya Thackeray
शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे

सातारा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या विरोधात शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेली शिवसंवाद यात्रा ( Shivsanvad Yatra in Patan constituency ) मंगळवारी (दि. 2 ऑगस्ट) बंडखोर आमदार शंभूराज देसाईंच्या पाटण विधानसभा मतदार संघात ( Aditya Thackerays meeting in MLA Shambhuraj Desais Patan constituency ) येणार आहे. यावेळी मल्हारपेठमध्ये शिवसैनिकांचा मेळावा ( Shiv Sainiks Gathering in Malharpeth ) होणार आहे. या मेळाव्यात आदित्य ठाकरे शंभूराजेंचा कसा समाचार घेतात ( Aditya Thackeray's reply to rebel MLA Shambhuraj Desai ) , याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

Shivsenas rebel MLA Shambhuraj Desai
शिवसेनेचे बंडखोर आमदार शंभूराज देसाईं

बंडखोरीच्या घडामोडीत शंभूराज होते आघाडीवर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे बंडखोरीच्या घडामोडीमध्ये आघाडीवर होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्रीपद देऊनही शंभूराजे बंडखोरांच्या गटात आघाडीवर राहिल्यामुळे पाटण विधानसभा मतदार संघात आदित्य ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. मंगळवारी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने होणार्‍या मेळाव्यात आदित्य ठाकरे शंभूराजेंचा जोरदार समाचार घेणार असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदमांना देणार ताकद - सातारा जिल्ह्य़ात नव्याने पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करत शिवसेनेने आगामी निवडणुकीच्या तयारीचे रणशिंग फुंकले आहे. मल्हारपेठ येथील हर्षद कदम यांना पुन्हा शिवसेना जिल्हाप्रमुखपद देऊन ताकद दिली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांना शंभूराजेंच्या विरोधात उमेदवारी दिली जाऊ शकते. सातारा जिल्ह्याचे माजी संपर्कप्रमुख मदन कदम यांचे ते पुतणे आहेत. पाटण तालुक्यात शिवसेनेची आठ ते दहा हजार हक्काची मते आहेत. ती मते शंभूराज देसाईंच्या पारड्यात पडल्यामुळे त्यांचा मोठ्या फरकाने विजय झाल्याचा शिवसैनिकांचा दावा आहे. पुढील निवडणूक तिरंगी झाल्यास शिवसेनेची मते पाटण मतदार संघात उलथापालथ घडवू शकतात. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार शंभूराजेंच्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

हेही वाचा- Sanjay Raut Arrest: राऊतांना घेऊन ईडीचं पथक जे.जे रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.