सातारा - मोक्का कारवाईनंतर फरार झालेला आरोपी अभिनंदन झेंडे हा मोबाईल चोरताना आग्रा येथे पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यानंतर कराड शहर पोलिसांनी मंगळवारी त्याला आग्रा पोलिसांकडून ताब्यात घेतले. कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर झेंडे याला हजर केले असता, न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - साताऱ्यात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू
कराड येथील मटका बुकी अल्ताफ पठाण याचा मुलगा निहाल पठाण याच्याकडे अभिदंन झेंडेच्या टोळीने 50 हजारांची खंडणी मागितली होती. त्याविरोधात निहाल पठाण याने कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अभिनंदन झेंडे, प्रतिक चव्हाण ऊर्फ बबल्या, अविनाश काटे, प्रशांत करवले, पवन सोळवंडे यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अभिनंदन झेंडे फरार होता.
हेही वाचा - कराड-रत्नागिरी मार्गावर भीषण अपघात; १ महिला ठार, ९ जखमी
झेंडे आग्रा (दिल्ली) येथे मोबाईल चोरताना उत्तर प्रदेश पोलिसांना रंगेहाथ सापडला. आग्रा पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने कराडमधील गुन्ह्याची कबुली दिली. कराड पोलिसांना हा प्रकार समजताच पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी विशेष पथक पाठवून झेंडे याला ताब्यात घेतले. कराडात आणून मोक्काच्या गुन्ह्यात अटक केली.