ETV Bharat / state

Lady Died Due to Electric Shock : इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावताना विजेचा धक्का लागून तरुणीचा मृत्यू - वीजेचा धक्का लागून तरुणीचा मृत्यू

इलेक्ट्रिक बाईकची ( Electric Bike ) बॅटरी चार्जिंगला लावत असताना वीजेचा धक्का लागून 23 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यात घडली आहे. शिवानी अनिल पाटील (रा. म्होप्रे, ता. कराड), असे तरूणीचे नाव आहे.

मृत शिवानी
मृत शिवानी
author img

By

Published : May 22, 2022, 8:27 PM IST

Updated : May 23, 2022, 11:08 AM IST

कराड (सातारा) - इलेक्ट्रिक बाईकची ( Electric Bike ) बॅटरी चार्जिंगला लावत असताना वीजेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवानी अनिल पाटील (वय 23 वर्षे, रा. म्होप्रे, ता. कराड), असे तरूणीचे नाव आहे.

बॅटरी चार्जिंगला लावताना लागला शॉक - कराड ग्रामीण पोलिसांनी ( Karad Rural Police ) दिलेली माहिती अशी, शिवानी पाटील ही रविवारी (दि. 22 मे) दुपारी इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावताना तिला वीजेचा जबर धक्का लागला. गंभीर अवस्थेत कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वींच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. सहायक फौजदार खाडे या घटनेचा तपास करत आहेत.

हेही वाचा - ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरखाली सापडल्याने शेतकर्‍याचा जागीच मृत्यू, कराडमधील वाघेरी येथील घटना

Last Updated : May 23, 2022, 11:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.