ETV Bharat / state

फलटण बसस्थानकात महिलेचा खून; संशयितास अटक - Avinash Jadhav arrest Phaltan

फलटण बसस्थानकात आश्रयास असलेल्या ५० ते ५५ वयाच्या बेघर महिलेचा खून झाला आहे. गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Nov 3, 2020, 6:30 PM IST

सातारा - फलटण बसस्थानकात आश्रयास असलेल्या ५० ते ५५ वयाच्या बेघर महिलेचा खून झाला आहे. या गुन्ह्यातील संशयिताला घटनास्थळावरून पकडण्यात आले आहे. अविनाश रोहिदास जाधव (रा. संतोषीमाता नगर, मलठण) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताने हे कृत्य दारूच्या नशेत केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण बसस्थानकांतर्गत बारामतीस जाण्यासाठी छोटेखानी बसस्थानक आहे. या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी शेड आहे. कोरोना संसर्गामुळे बसेस व प्रवासी संख्या फारशी नसल्याने या ठिकाणी फारशी वर्दळ नसते. या शेडमध्येच एक महिला गेल्या काही महिन्यांपासून आश्रयास होती. तिला चालता येत नसल्याने प्रवाशांकडून मागून घेऊन ती आपला उदरनिर्वाह करायची.

महिलेच्या तोंडातून व डोक्यातून रक्त येत होते

सकाळी सातच्या सुमारास बसस्थानकातील सुरक्षा रक्षक दत्तात्रय सोनवलकर बसस्थानकातील लाइट बंद करीत असताना त्याला शेडमध्ये एका बाकावर २५ ते ३० वयोगटातील तरुण अर्धनग्न अवस्थेत झोपला असल्याचे व बाकाखाली फरशीवर ५० ते ५५ वयोगटातील महिला पालथ्या व अर्धनग्न अवस्थेत पडल्याचे दिसले. महिलेच्या तोंडातून व डोक्यातून रक्त येत होते. सोनवलकर याने या प्रकाराची कल्पना आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ यांना दिली.

संशयिताच्या पँटवर रक्ताचे डाग

धुमाळ हे सोनवलकर यांच्यासमवेत गेले असता संशयित अविनाश जाधव हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, काहींनी त्यास पकडून ठेवले होते. त्याच्या पँटवर रक्ताचे डाग होते. फलटण शहर पोलिसांना घटनास्थळी मृत महिलेच्या आजूबाजूस रक्ताचे डाग दिसले. तिच्या तोंडाला मार लागला होता. तिला फरशीवर आपटून, अथवा हत्याराने केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक पाहाणीत दिसून आले.

श्वान संशयीता जवळ घुटमळले

पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख यांनी घटनास्थळास भेट देत पाहाणी केली. पोलीस पथकातील श्वानांना घटनास्थळी सापडलेल्या कपड्यांचा वास दिल्यानंतर ते संशयीत अविनाश जाधव याच्या जवळ घुटमळले. घटनास्थळी पोलिसांना दारूची बाटली, पेला, डिश आदी साहित्य मिळाले.

हेही वाचा- मंडप व्यावसायिकांच्या आंदोलनाला उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंचेही पाठबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.