ETV Bharat / state

जोर-जांभळी, मायणी संवर्धन राखीवसाठी 90 लाखांचा निधी; पायाभूत विकास होणार

पांढऱ्या रंगाच्या-अग्निपंखाच्या फ्लेमिंगोसह शेकडो परदेशी पाहुण्यांचा अधिवास असणारे सातारा जिल्ह्यातील मायणी परिसर व कोल्हे-रानकुत्री टोळ्यांच्या अस्तित्वामुळे आकर्षण केंद्र असलेल्या जोर-जांभळी (ता. वाई) या दोन नव्याने मंजूर झालेल्या संवर्धन राखीव वनक्षेत्राच्या विकासासाठी तब्बल 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

पायाभूत विकास होणार
पायाभूत विकास होणार
author img

By

Published : Jul 1, 2021, 4:01 PM IST

सातारा - पांढऱ्या रंगाच्या-अग्निपंखाच्या फ्लेमिंगोसह शेकडो परदेशी पाहुण्यांचा अधिवास असणारे सातारा जिल्ह्यातील मायणी परिसर व कोल्हे-रानकुत्री टोळ्यांच्या अस्तित्वामुळे आकर्षण केंद्र असलेल्या जोर-जांभळी (ता. वाई) या दोन नव्याने मंजूर झालेल्या संवर्धन राखीव वनक्षेत्राच्या (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) विकासासाठी तब्बल 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

जोर-जांभळी व मायणी संवर्धन राखीवसाठी 90 लाखांचा निधी, पायाभूत विकास होणार

छत्रपतींना शिकारीसाठी मायणीचे क्षेत्र होती राखीव

मार्च 2021 मध्ये सातारा जिल्ह्यातील मायणी तलावासह येराळवाडी, कानकात्रे व सुर्याचीवाडी तलाव या क्षेत्रास समूह पक्षी संवर्धन राखीव तर वाई तालुक्यातील जोर-जांभळीच्या खोऱ्यास नुकताच संवर्धन राखीव वनक्षेत्राचा दर्जा मिळाला. सुमारे 6 हजार 511 हेक्टरचे जोर-जांभळी क्षेत्र तर साताऱ्यातील पक्ष अधिवासाकरिता महत्त्वाच्या असणाऱ्या 'मायणी' वनक्षेत्रालाही (866 हेक्टर) हा दर्जा आहे. ब्रिटिश काळात कोल्हापूरच्या छत्रपतींना शिकारीसाठी मायणीचे क्षेत्र राखीव होते, अशी नोंद आढळते.

संरक्षणासाठी जास्त मनुष्यबळ

साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मंजूर निधी संदर्भात सांगितले, "की जोर-जांभळी करिता 70 लाख तर मायणी करिता 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संवर्धन राखीवचा दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात शासनाने निधीची तरतूद केली आहे. या दोन्ही ठिकाणचा संवर्धन आराखडा तयार केला जाईल. त्यानुसार कामे केली जातील. दोन्ही मायणी वनक्षेत्रासाठी एकूण दोन वनपाल आणि सहा वनरक्षक असे मनुष्यबळ मंजुरीनंतर देण्यात येईल.

ही होणार कामे -
पर्यटक तसेच प्राणी अभ्यासक, पक्षीप्रेमी यावेत यासाठी प्रचार-प्रसिद्धी, पाणवठे यांची निर्मिती व विकास, मचाण, निरीक्षण मनोरे, कॅमेरा ट्रॅप, संरक्षण कुटी, प्राण्यांसाठी कुरण विकासाच्या माध्यमातून खाद्य निर्मिती आदी विविध कामांचा संवर्धन आराखड्यात समावेश असेल. या कामांसाठी पशुपक्ष्यांना अनुकूल अधिवास निर्माण करण्यात येईल. त्यामुळे पर्यटक व अभ्यासकांची ही चांगली सोय होईल, असे श्री. मोहिते यांनी सांगितले.

काय आहे जोर-जांभळी अन् मायणीत
वाईपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर सातारा-पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर जोर व जांभळीचे खोरे आहे. या भागात वन्यप्राणी भरपूर आहेत. विशेषतः लहान श्वानांची संख्या अधिक आहे. नव्या मायणी समूहपक्षी संवर्धन राखीवमध्ये अमेरिकेतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारे ग्रेटर फ्लेमिंगो, लेसर फ्लेमिंगो यासह स्थानिक चित्रबलाक, कॉमन टील, कॉम्ब डक, कॉमन कूट ही बदके, ओपनबिल स्टॉर्क, स्पूनबील यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे करकोचे- बगळे यांचा अधिवास आहे.

पर्यावरणप्रेमींकडून स्वागत
आत्ता मंजूर झालेला निधी हा तातडीचा पहिला टप्पा आहे. यानंतरही गरजेनुसार शासनाकडून तेथील विकासासाठी वेळोवेळी निधी दिला जाईल. या संवर्धन राखीव क्षेत्रांच्या मजबुतीकरणासाठी या निधीचा मोठा उपयोग होईल, असे महादेव मोहिते यांनी सांगितले. 'ड्रोंगो' या पर्यावरणवादी संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे यांनी विकास निधीचे स्वागत केले. 'जोर-जांभळी आणि मायणी समूह पक्षी संवर्धन राखीव या क्षेत्राला विशेष दर्जा मिळाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात मोठा निधी उपलब्ध झाला. यातून वन्यजीव तसेच पशुपक्ष्यांसाठी पाणवठे, चराऊ कुरण आदी पायाभूत गोष्टींचा विकास होईल' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. "दोन्ही क्षेत्रात पर्यटन वाढीबरोबरच स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीला चालना मिळेल. संवर्धन राखीवच्या दर्जानंतर खासगी जागा संपादन अथवा कोणतीही ज्यादा जाचक बंधने स्थानिकांवर पडत नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याबरोबरच पर्यटन वाढीतून रोजगार निर्मितीसाठी याचा लाभ होईल, असे मत मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - "डॉक्टर डे"लाच पुण्यातल्या डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या, काही महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.