ETV Bharat / state

कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये 5 हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात

कराडच्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे पाचवे सहस्त्रक अर्थात 5 हजाराचा टप्पा पूर्ण केला आहे. आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून 5 हजार 23 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 1 हजार 753 कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश आले आहे.

कराड
कराड
author img

By

Published : Jun 17, 2021, 10:31 AM IST

कराड (सातारा) - कराडच्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे पाचवे सहस्त्रक अर्थात 5 हजाराचा टप्पा पूर्ण केला आहे. आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून 5 हजार 23 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 1 हजार 753 कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश आले आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने सुरूवातीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान दिले आहे.

कोरोना विशेष वॉर्डमधील उपचारांमुळे गेल्या वर्षी (18 एप्रिल 2020) पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता. आज अखेर कृष्णा हॉस्पिटलने 5 हजार 23 रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. कोरोनामुक्तीचे पाचवे सहस्त्रक पूर्ण करून कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाकाळात दर्जेदार सेवेचे उदाहरण वैद्यकीय क्षेत्रापुढे ठेवले आहे.

पाचवे सहस्त्रक पूर्ण करत असताना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. विश्वास पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.