ETV Bharat / state

Coronavirus : पाच वर्षीय चिमुकलीचा खेळातून 'स्टे अ‌ॅट होम'चा संदेश, व्हिडिओ व्हायरल

रुचिता क्षीरसागर या 5 वर्षीय चिमुकलीने 'घरा'च्या खेळातून 'स्टे अ‌ॅट होम'चा संदेश दिला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Satara
स्टे अ‌ॅट होम
author img

By

Published : May 9, 2020, 2:46 PM IST

सातारा - कोरोनाचा धसका आता संपूर्ण जगाने घेतला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषित करण्यात आला आहे. लॉडाऊनच्या परिस्थितीत शाळांना सुट्टी आहे. 'स्टडी फ्रॉम होम' या संकल्पनेतून शिक्षण सुरू आहे. या पार्श्वभमीवर आता मुलांचे खेळणेही घरातच सुरू आहे. पारंपरिक खेळांबरोबर नवनवीन खेळही कुटुंबातील सदस्य मुलांसोबत खेळताना दिसत आहेत. दरम्यान, रुचिता क्षीरसागर या 5 वर्षीय चिमुकलीने 'घरा'च्या खेळातून 'स्टे अ‌ॅट होम'चा संदेश दिला आहे. तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

5 वर्षीय चिमुकलीचा खेळातून 'स्टे अ‌ॅट होम'चा संदेश

बारामतीच्या अनंत इंग्लिश स्कूलमध्ये छोट्या गटात शिकणाऱ्या या बालिकेने आपल्या वडीलांकडे हट्ट धरून 2 महिन्यांपूर्वी घराचे साहित्य विकत घेतले. आणि तंबूवजा घर बनविण्याचा आपला हट्ट सरावाने पूर्ण केला. 'घर बन गया मेरा' असे लडिवाळपणे ती घरातील व शेजारील लोकांना आनंदाने सांगायची. दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्या, परिवारातील चर्चा आणि लोकांचे बदलेलेले वागणे पाहून कोरोना म्हणजे काहीतरी भयंकर आहे. त्यापासून दूर राहण्यासाठी आपण घरात बंदिस्त झाल्याची जाणीव तिला झाली. त्यातून तिच्या खेळात 'कोरोना' आला.

व्हिडिओ मध्ये ती आपले तंबूवजा छोटे घर दाखवून त्यात ती प्रवेश करते आणि सध्या लॉकडाऊन असल्यामुळे घरातच थांबण्याचा व घरातच खेळण्याचा संदेश देते. बाहेर कोरोना असून कोणीही बाहेर पडू नये, असाही संदेश इंग्लिशमध्ये ती देताना दिसत आहे. तिचे हावभाव व अभिनय पाहता सोशल मिडीयावर या व्हिडीओला चांगली पसंती मिळाली आहे.

रुचिताची आई ज्योती क्षीरसागर बारामती येथील महिला रुग्णालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून काम करते. त्यांनीच रुचिताचा असा व्हिडीओ सुरुवातीला तिच्या नकळत चित्रीत केला. थोड्या सरावाने तिने त्यात प्रभुत्व मिळविल्याचे ज्योती क्षीरसागर यांनी सांगीतले. तीचे वडील राजेश क्षीरसागर हे सातारा येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. घरातच समाजशिक्षणाचे बाळकडू मिळत असल्याने तिचा हा व्हिडिओ उठावदार झाला असून याबाबत तिचे अनेकांनी कौतुक केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.