ETV Bharat / state

सातारा : टेंभुच्या पाण्यासाठी 32 गावांची कुकुडवाड येथे पाणी परिषद

माण तालुक्यातील कुकुडवाड व पुकळेवाडी यांसोबत सोळा गावे, तर खटाव तालुक्यातील सोळा गावे अशी एकूण 32 गावांना टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी 20 जुलै रोजी कुकुडवाड येथे पाणी परिषदेचे आयोजन केले आहे.

टेंभुच्या पाण्यासाठी 32 गावांची कुकुडवाड येथे पाणी परिषद
author img

By

Published : Jul 20, 2019, 2:04 PM IST

सातारा - माण व खटाव तालुक्यातील 32 गावांना टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी 20 जुलै रोजी कुकुडवाड येथे पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या गावांना पाणी देण्याचा शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी या पाणी परिषदेमार्फत करण्यात आली आहे.

माण तालुक्यातील कुकुडवाड व पुकळेवाडी यांसोबत सोळा गावे, तर खटाव तालुक्यातील सोळा गावे अशी एकूण 32 गावे शासनाच्या दुष्कळग्रस्तांसाठी राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेत समाविष्ट नाहीत. दुष्काळी भागासाठी असणाऱ्या व माण, खटाव तालुक्यातून जाणाऱ्या उरमोडी, जिहे-कटापूर, टेंभू या प्रकल्पांत ३२ पैकी एकाही गावाचा समावेश नसल्याने गावे सतत दुष्काळाने होरपळत आहेत. जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाचा थेंबही या भागात पडलेला नाही. तसेच दरवर्षी पावसाचे प्रमाण प्रचंड कमी होत असल्याने पाणी हे या भागात चिंतेची बाब बनली आहे.

टेंभुच्या पाण्यासाठी 32 गावांची कुकुडवाड येथे पाणी परिषद

दुष्काळी भागासाठी असलेल्या टेंभू योजनेतून या दोन्ही तालुक्यातील वंचित गावांना पाणी देणे शक्य आहे. परंतु, आजपर्यंत या गावाचा शासनाने सकारात्मक विचार केलेला नसल्याने ही ३२ गावे पाण्यापासून कायम वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या ३२ गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून पाणी मिळवण्यासाठी तिसऱ्या एल्गार परिषदेचे कुकुडवाड येथे आयोजन केले आहे.

Intro:सातारा: माण व खटाव तालुक्यातील 32 गावांना टेम्भू उपसा जल सिंचन योजनेतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे या मागणीसाठी 20 जुलै रोजी दुपारी तीन वाजता कुकुडवाड येथे पाणी परिषदेचे आयोजन केल्याची माहिती संयोजन समितीने दिली आहे.Body: या बाबत अधिक माहिती अशी की माण तालुक्यातील कुकुडवाड, पुकळेवाडी सह सोळा गावे व खटाव तालुक्यातील कलेढोण,विखळे या गावसह सोळा गावे अशी एकूण 32 गावे दुष्काळी भागासाठी असणाऱ्या कोणत्याही योजनेत समावेशीत नाहीत.दुष्काळी भागासाठी असणाऱ्या व माण व खटाव तालुक्यातून जात असलेल्या उरमोडी,जिहे-कटापूर,टेंम्भू, या कोणत्याच योजनेत या ३२ गावांचा समावेश झाला नाही.त्यामुळे ही गावे कायम दुष्काळाने होरपळत आहेत.आजही जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाचा थेंबही या भागात पडला नाही.दरवर्षी पावसाचे प्रमाण प्रचंड कमी होत असून ही दुष्काळी भागाच्या चिंतेची बाब बनली आहे.

दुष्काळी भागासाठी असलेल्या टेंम्भू योजनेतून या दोन्ही तालुक्यातील वंचित गावांना पाणी देणे शक्य आहे.परंतु आजपर्यंत या गावाचा शासनाने सकारात्मक विचार केलेला नाही त्यामुळे ही ३२ गावे पिण्याचे व शेतीसाठी च्या पाण्यापासून कायम वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या गावांना दुष्काळी भागासाठी असणाऱ्या टेंभू योजनेतून पाणी न मिळाल्यास व भविष्यात पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास प्रत्येक गावातील नागरिकांना पाण्यासाठी गाव सोडून जावे लागेल ही वस्तुस्थिती समोर दिसू लागली आहे.त्यामुळे या ३२ गावातील नागरिकांनी एकजूट करून या गावांना टेम्भू उपसा जलसिंचन योजनेतून पाणी मिळवण्यासाठी तिसऱ्या एल्गार परिषदेचे कुकुडवाड येथे आयोजन केले आहे.विधान सभेच्या निवडणुकीपूर्वी या ३२ गावांना पाणी देण्याचा शासनाने निर्णय करावा या मागणी साठी या पाणी परिषदेसाठी आयोजन करण्यात आले आहे.तरी ३२ गावातील महिला व पुरुषांनी या परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपली एकजूट दाखवून द्यावी असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करणेत आले आहे.

(माण व खटाव तालुक्यातील वंचित दुष्काळी भागाला पाणी मिळवण्यासाठी प्रत्येक गावात आता ठिणगी पेटली आहे पाण्याशिवाय आपण आपल्या गावात राहू शकत नाही.व आमची मुलं बाळ जनावरे जगत नाहीत याची जाणीव प्रत्येक नागरिकाला झाली असून या ठिणगी चा भडका होण्याआधी शासनाने लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षाअसे संयोजन सामीतिचे चांगदेव काटकर,महादेव काटकर, दिपक खताळ, राम देशमुख,व इतर सदस्यांनी व्यक्त केली आहे.)Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.