ETV Bharat / state

कराडजवळ एकाच रात्रीत 2 अपघात; 3 ठार, 4 गंभीर - कराडमध्ये अपघात

पाचवड फाटा (ता. कराड) येथे ऊसतोड मजूरांना घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून टेम्पोने धडक दिली. यामध्ये ट्रॉलीतील 2 ऊसतोड मजूर ठार झाले आणि टेम्पो चालकासह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

accident
कराडजवळ एकाच रात्रीत 2 अपघात
author img

By

Published : Apr 14, 2020, 10:44 AM IST

कराड (सातारा) - पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर एकाच रात्रीत झालेल्या 2 वेगवेगळ्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोन्ही अपघातांची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा - वाशिममधून पाटणला फोन... मुलीवर वेळेत उपचार

पाचवड फाटा (ता. कराड) येथे ऊसतोड मजूरांना घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून टेम्पोने धडक दिली. त्यामध्ये ट्रॉलीतील 2 ऊसतोड मजूर ठार झाले आणि टेम्पो चालकासह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मालखेड फाटा (ता. कराड) येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला.

राजू रामू राठोड (वय 35) व खुबा किसन जाधव (वय 47, दोघेही रा. आचरी-तांदाळ, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), अशी ठार झालेल्या ऊसतोड मजूरांची नावे आहेत. या अपघातात सुरज केशव राठोड, अमीत खुबा जाधव व राम मुन्ना राठोड हे तीन मजूर आणि टेम्पो चालक अन्वर पठाण हे गंभीर जखमी झाले आहेत. मालखेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार प्रीतम गणपती पवार (वय 28, रा. मालखेड, ता. कराड) हा ठार झाला.

हेही वाचा - कोरोनाविरोधातील लढ्यात काँग्रेसची 'टास्क फोर्स' करणार सरकारला मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.