सातारा - जिल्ह्यात गेल्या २४ तासात 2 हजार 692 नागरिकांचे कोरोना अहवाल पॅझिटिव्ह आले असून 41 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 881 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - धक्कादायक..! डॉक्टरांनी मृत रुग्णावर चक्क ४ दिवस केला उपचार, नांदेडमधील रुग्णालयातील प्रकार
फलटणला सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यात आढळलेल्या बाधितांपैकी फलटणमध्ये सर्वाधिक 494 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय जावली 112, कराड 234, खंडाळा 122, खटाव 323, कोरेगांव 362, माण 221, महाबळेश्वर 43, पाटण 86, सातारा 492, वाई 174 व इतर 29 असे बाधीत आढळले. यामुळे बाधितांची एकूण संख्या 1 लाख 41 हजार 312 वर पोहचली आहे. तर गेल्या 24 तासांत झालेल्या 41जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जावली 3, कराड 2, खंडाळा 2, खटाव 8, कोरेगांव 4, माण 1, महाबळेश्वर 0, पाटण 1, फलटण 5, सातारा 9 व वाई तालुक्यातील 6 जणांचा समावेश आहे.
2 हजार 881जणांना डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2881 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 19 हजार 185 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.