ETV Bharat / state

सेवागिरी विद्यालयातील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या 25 वर

author img

By

Published : Feb 24, 2021, 8:35 PM IST

खटाव तालुक्यातील पुसेगावच्या सेवागिरी विद्यालयातील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून, हा आकडा 25 पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेली शाळा सुरु करण्याबाबत येत्या शनिवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

25 students infected with corona
सेवागिरी विद्यालयातील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या 25 वर

सातारा - खटाव तालुक्यातील पुसेगावच्या सेवागिरी विद्यालयातील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून, हा आकडा 25 पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेली शाळा सुरु करण्याबाबत येत्या शनिवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

दहावीतील 13 विद्यार्थी कोरोनाबाधित

सेवागिरी विद्यालयातील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवीचे 4 विद्यार्थी, सहावी आणि सातवीचा प्रत्येकी 1 विद्यार्थी, आठवीचे दोन विद्यार्थी, नववीचे 4 विद्यार्थी तर दहावीच्या तब्बल 13 विद्यार्थांचा समावेश आहे. पुसेगावच्या या शाळेमध्ये पुसेगावसह परिसरातील बुध, नेर, वेटणे या गावातील तब्बल 739 विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत 13 फेब्रुबारीला पहिला कोरोनाबाधित विद्यार्थी सापडला होता, त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. दररोज 55 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 25 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

शाळा सुरू करण्याबाबत शनिवारी निर्णय

सेवागिरी विद्यालयात पहिला कोरोनाबाधित विद्यार्थी 13 फेब्रुवारीला सापडला होता, तेव्हापासून शाळा बंद आहेत. मात्र तरी देखील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. शाळा सुरू करायच्या की नाही, कधी सुरू करायच्या याबाबत येत्या शनिवारी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.