ETV Bharat / spiritual

'मेष ते मीन' सर्व राशींसाठी कसा असेल आजचा रविवार? वाचा राशीभविष्य - Horoscope 22 September 2024

Horoscope 22 September 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ ईटीव्ही भारतवरील या राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2024, 3:57 AM IST

  • मेष (ARIES) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्र, कुटुंबीय ह्यांच्यासह एखाद्या स्नेहसंमेलनास जाऊ शकाल. दुपारनंतर मात्र, काही कारणास्तव आपली प्रकृती नरम गरम होईल. आपल्या आहाराकडं लक्ष द्यावं लागेल. आर्थिक देवाण- घेवाणीत सुद्धा सावध राहावे लागेल. मनाच्या उदासीनतेमुळं नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे.
  • वृषभ (TAURUS) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज कुटुंबियांशी आपण विचार-विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. दुपारनंतर आपण सामाजिक कार्यात जास्त रस घ्याल. मित्रांकडून लाभ होईल. स्वकीयांशी संपर्क वाढून त्यांच्याशी संबंध सुधारतील. संततीकडून एखादा लाभ संभवतो. नवीन परिचयामुळं मन आनंदित होईल. अचानक धनलाभ संभवतो.
  • मिथुन (GEMINI) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी असेल. व्यक्तिगत, व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल. कामाचा व्याप वाढून त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मित्रांच्या भेटीनं आनंद होईल. त्यांच्यासह सहलीला जाण्याचा बेत आखाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
  • कर्क (CANCER) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. आपला संताप वाढेल. दुपार नंतर मात्र शारीरिक उत्साह व मानसिक खंबीरता ह्यामुळे थोडाफार आनंद मिळवू शकाल. कुटुंबियांशी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकाल. घराचे नूतनीकरण करण्यात आपण स्वारस्य दाखवाल व त्या दिशेने काही पाऊल उचलाल.
  • सिंह (LEO) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक, मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्यानं इतरांशी मतभेद होतील. दुपारनंतर शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी होईल. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकाल. कुटुंबियांशी सुद्धा महत्त्वाच्या विषयावर विचार-विनिमय करू शकाल.
  • कन्या (VIRGO) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात आणि प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम आणि तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील. एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवू शकाल. प्रकृतीच्या कटकटींमुळं हैराण व्हाल. त्यामुळं आपला संताप वाढेल. मात्र, त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या कामावर होणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. आपल्या संतापामुळं कोणाचं मन दुखावणार नाही, याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. एखाद्या धार्मिक समारंभात सहभागी व्हाल.
  • तूळ (LIBRA) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. एखाद्या प्रवासामुळं काही आर्थिक लाभ संभवतो. मात्र, दुपारनंतर एखादा अनर्थ टाळण्यासाठी आपणास आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. नवीन कार्य सुरु करताना अडचणी येतील.
  • वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क आणि इतरांत मिळून-मिसळून राहण्याच्या दृष्टीनं चांगला आहे. जवळचा प्रवास संभवतो. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. दुपारनंतर मित्र व कुटुंबियांसह प्रवासाचे आयोजन करू शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वैचारिक पातळीवर अती उत्साहास आवर घालावा लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
  • धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज शारीरिक, मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रमा नंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. प्रवासात अडचणी येतील. दुपारनंतर परिस्थितीत आपणास अनुकूल असा बदल घडून येईल. शरीरात उत्साह संचारेल. आर्थिक लाभ संभवतात. व्यावसायिक नियोजन योग्य प्रकारे कराल. उर्वरित वेळ आनंदात जाईल.
  • मकर (CAPRICORN) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण फारच भावनाशील व्हाल. आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. संकटात टाकणारे विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा. कोणत्याही गोष्टीत घाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबीयांशी मतभेद वाढणार नाहीत ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. कार्यपूर्तीसाठी आज कठोर परिश्रम करावं लागतील.
  • कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल नाही. मात्र, नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपारनंतर मानसिक व्यग्रता वाढेल. संपत्तीविषयक दस्तावेज करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आज आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल.
  • मीन (PISCES) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळं मन बेचैन होईल. मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबीत सावध राहा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावं लागेल. विचार सारखे बदलत राहतील, त्यामुळे मनःस्थिती द्विधा होईल. निर्णय क्षमतेचा अभाव राहील. आपले विचार मात्र प्रगल्भ होतील.

हेही वाचा -

पितृपक्षात 'या' वेळेत करा श्राद्ध विधी; पितृदोषापासून मिळेल मुक्ती - Pitru Paksha 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.