कराड (सातारा) - बिबट्याच्या हल्ल्यात २० वर्षाचा मुलगा जखमी झाल्याची घटना शेडगेवाडी-विहे (ता. पाटण) येथे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. ऋषिकेश अरविंद थोरात, असे मुलाचे नाव आहे.
जेवण केल्यानंतर घराबाहेर गेलेला ऋषिकेश रस्ता ओलांडताना अचानक समोर बिबट्या आला. त्यानंतर बिबट्याने ऋषिकेशवर हल्ला केला. आजुबाजूच्या मुलांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याचा पंजा लागल्याने ऋषिकेशच्या उजव्या मांडीला आणि हाताला जखम झाली आहे.
कुटुंबीयांनी ऋषिकेशवर स्थानिक डॉक्टरांकडे नेऊन उपचार केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे हे कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून रात्री एकट्याने घराबाहेर न पडण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.
हेही वाचा - ३०० फूट दरीत कोसळला वऱ्हाडाचा ट्रक; तीन ठार, 64 जखमी