ETV Bharat / state

Satara Crime : ऊसाच्या शेतात लपवून ठेवलेला तब्बल 15 लाखांचा गांजा जप्त

साताऱ्यात स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व म्हसवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवैध रित्या साठवलेल्या गांजा विरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६० किलो गांजा जप्त केला आहे.

ganja bags seized
गांजा पोती जप्त
author img

By

Published : Jan 28, 2023, 7:25 AM IST

Updated : Jan 28, 2023, 10:31 AM IST

सातारा : उसाच्या शेतामध्ये लपवून ठेवलेला तीन पोती गांजा स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांनी जप्त केला आहे. बाजारपेठेत या गांजाची किंमत १५ लाख रूपये आहे. अवैध रित्या शेतामध्ये गांजा ठेवल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चरण लालासो शिंदे याच्यावर एनपीडीए कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई : स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व म्हसवड पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत एनडीपीएस कायद्यांतर्गत १५ लाखांचा ६० किलो गांजा जप्त केला आहे. पाणवण (ता. माण) येथील चरण लालासो शिंदे याने घराजवळील शेतामध्ये गांजाचा साठा करुन उसाच्या शेतामध्ये लपवून ठेवला होता. त्या संबंधीत माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी म्हसवड पोलिसांच्या मदतीने छापा मारून गांजा जप्त करण्यात आला.

सातारा, म्हसवड पोलिसांची संयुक्त कारवाई : पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, रवींद्र भोरे, उपनिरीक्षक रवींद्र डोईफोडे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, गणेश कचरे, मुनीर मुल्ला, पोना प्रमोद सांवत, अमित सपकाळ, गणेश कापरे, मयुर देशमुख, धीरज महाडीक, मोहसीन मोमीन, संकेत निकम, वैभव सावंत, स्वप्नील दौंड यांनी ही कारवाई केली.

कोयता गॅँगची दहशत : साताऱ्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. पोवई नाक्यावर काही तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवल्याचा प्रकार ( सो. 23 जानेवरी ) ला घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पुण्यातील कोयता गॅँगच्या मुसक्या आवळल्या नंतरही कोयते नाचवून दहशत माजविणाऱ्यांना जरब बसलेला नाही, हे साताऱ्यातील घटनेवरून स्पष्ट होत आहे. पोवई नाक्यावरील सयाजीराव हायस्कूलसमोर काही तरूण हातात कोयते घेऊन दहशत करत असल्याची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी दोघांना तात्काळ ताब्यात घेतले होते. पळून जाणाऱ्या तिघांना शिताफीने पकडले गेले. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील उपनगरामध्ये कोयता गँगमधील गुंडांनी धुमाकूळ घालून हातगाड्या, दुकानांचे नुकसान करत दहशत माजवली होती. पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी दहशत माजवणाऱ्या गुंडांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर पेन्शनर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यातही कोयता गँग सक्रीय झाली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Pune Crime: लहान बहिणीशी अश्लील चाळे करणाऱ्या विवाहित बहिणीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Last Updated : Jan 28, 2023, 10:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.