ETV Bharat / state

कराड तालुक्यातील 12 एकर ऊस पेटला; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान - उसाला आग

वाळलेल्या उभ्या पीकाला भर दुपारी आग लागून उन्हामुळे ती वेगात पसरली. विलास बाळू यादव यांचा 12 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला आहे.

12 एकरातील उसाला आग
author img

By

Published : Nov 18, 2019, 9:56 PM IST

सातारा - तालुक्यातील येरवळे गावात भर दुपारी आग लागल्याने 12 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विलास बाळू यादव असे शेतमालकाचे नाव आहे. घटनेत 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा - सांगलीत ऊस दर आंदोलनाची ठिणगी, एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक

आत्ता कुठे ऊसतोड मजुर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येऊ लागले आहे. काही ठिकाणी शेतात अजुनही पाणी आणि ओल आहे. त्यामुळे ऊसतोडी सुरू करण्यासाठी बर्‍याच ठिकाणी अडचणी येत आहेत. ओल असल्यामुळे ऊस वाहतूक करणारे वाहन शेतात जाण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे कारखान्यांनीही गळीत हंगाम सुरू केलेला नाही. वाळलेल्या उभ्या पिकाला भर दुपारी आग लागून उन्हामुळे ती वेगात पसरली. हातातोंडाशी आलेले उसाचे पीक आगीत खाक झाल्यामुळे विलास यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे. या घटनेचा कराड शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:भर दुपारी आग लागल्याने 12 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना कराड तालुक्यातील येरवळे गावात घडली. या घटनेत 12 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. Body:
कराड (सातारा) - भर दुपारी लागलेल्या आगीत 12 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना कराड तालुक्यातील येरवळे गावात घडली. या घटनेत 12 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 
  येरवळे या गावातील विलास बाळू यादव या शेतकर्‍याच्या उसाला भर दिवसा आग लागली. उन्हामुळे आग वेगात पसरली. विलास यादव यांच्या शेताच्या लगत अन्य शेतकर्‍यांचेही उसाचे क्षेत्र आहे. आग पसरत जाऊन सुमारे 12 एकरातील ऊस आगीत जळून खाक झाला. या घटनेत 12 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विलास यादव यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यावरून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, यंदा परतीच्या पावसामुळे उसाचा गळीत हंगाम फारच लांबला आहे. ऊसतोड मजुरांचे आता कुठे कारखान्यांच्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात आगमन होऊ लागले आहे. काही ठिकाणी शेतात अजुन पाणी आहे, तर काही ठिकाणी ओल आहे. त्यामुळे ऊसतोडी सुरू करण्यास बर्‍याच ठिकाणी अडचणी आहेत. पाणी आणि ओल असल्यामुळे ऊस वाहतूक करणारे वाहन शेतात जाण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे कारखान्यांनीही गळीत हंगाम सुरू केलेला नाही. येत्या चार दिवसांत कराड तालुक्यातील काही कारखाने गळीत हंगामाचा शुभारंभ करणार आहेत. महापूर आणि अतिवृष्टीमुळे उसासारख्या पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यातच हातातोंडाशी आलेले उसाचे पीकही आगीत खाक झाल्यामुळे येरवळेतील संबंधित शेतकर्‍यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.