कोल्हापूर - माथेरान नगरपरिषदेमधील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला. एकूण 14 नगरसेवकांपैकी दहा नगरसेवकांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा केला. या दहा जणांमध्ये उपनगराध्यक्षाचा सुद्धा समावेश आहे.
हेही वाचा - 'तौक्ते'तील नुकसानग्रस्तांना पॅकेज जाहीर, तर चंद्रपुरातील दारूबंदी उठवली; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय!
शिवसेनेला जबर धक्का
एकाच वेळी 10 नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या नगरसेवकांमध्ये आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष) राकेश चौधरी, सोनम दाबेकर, ज्योती सोनवणे, चंद्रकांत जाधव, संदीप कदम, प्रतिभा घावरे, सुषमा जाधव, प्रियंका कदम, रूपाली आखाडे यांचा समावेश असून यांचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 14 पैकी 10 जणांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने माथेरानमधील एकूणच सत्ता समीकरण बदलले आहे.