ETV Bharat / state

Wild Animal Skin Smuggler Jailed : वन्य प्राण्यांच्या कातड्यांची तस्करी करणारा जेरबंद, 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

वन्य प्राण्यांच्या कातड्यांची तस्करी करणाऱ्या एका तस्कराला मिरजेत पोलिसांनी जेरबंद (Wild animal skin smuggler Miraj Sangli) केले आहे. त्याच्याकडून बिबट्या, सांबार आणि खवल्या मांजराचे अवशेष आणि कातडी, असा सुमारे 28 लाखांचा मुद्देमाल जप्त (28 lakh worth seized in Sangli) करण्यात आला आहे.

Wild Animal Skin Smuggler Jailed
Wild Animal Skin Smuggler Jailed
author img

By

Published : Oct 28, 2022, 6:17 PM IST

सांगली : वन्य प्राण्यांच्या कातड्यांची तस्करी करणाऱ्या एका तस्कराला मिरजेत पोलिसांनी जेरबंद (Wild animal skin smuggler Miraj Sangli) केले आहे. त्याच्याकडून बिबट्या, सांबार आणि खवल्या मांजराचे अवशेष आणि कातडी, असा सुमारे 28 लाखांचा मुद्देमाल जप्त (28 lakh worth seized in Sangli) करण्यात आला आहे. मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Sangli latest News), (Sangli Crime)

सापळ्यात अडकला तस्कर - मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाणे आणि सांगली वन्य विभागाने संयुक्तरित्या वन्य प्राण्यांची कातडी आणि अवशेष तस्करी करणाऱ्या इसमाला जेरबंद करून सुमारे 28 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरज पोस्ट ऑफिस जवळ असणाऱ्या जकात नाक्यासमोर एक इसम हा वन्य प्राण्याचे कातडी तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीसांच्या पथकाला मिळाली होती. या आधारे पोलिसांनी सापळा रचून अशोक सदाशिव कदम (वय 55, राहणार कदमवाडी,राधानगरी जिल्हा कोल्हापूर) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली.

वन्य प्राण्यांच्या अवशेषाची तस्करी करणारा अटकेत

तपासणीत प्राण्यांचे अवशेष आढळले - तस्कराकडे दोन प्लास्टिकची पोती आढळून आली. ज्यामध्ये बिबट्याचे एक कातडे, सांबरची दोन शिंगे व खवल्या मांजराच्या अंगावरील सुमारे 18 किलो वजनाचे खवल्या आढळून आल्या. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याच्याकडील सुमारे 28 लाखांचे वन्य प्राण्यांचे अवशेष जप्त करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.