ETV Bharat / state

विधवा वहिनीशी दिराने बांधली लग्नगाठ, उच्चशिक्षित कुटुंबाचा पुढाकार

सांगलीच्या मराठा समाजानेही पाटील कुटुंबाच्या या पुरोगामी निर्णयाचे स्वागत केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर मराठा समाजात एक क्रांतिकारक बदल घडवणार हा निर्णय असून या लग्नामुळे नात्याला माणुसकीची किनार मिळाल्याची भावना मराठा समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

विधवा वहिनीश लग्नगाठ बांधताना दीर
author img

By

Published : Mar 16, 2019, 10:39 PM IST

सांगली - कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है केहना! असे असले तरी आजच्या काळात अनेक रूढी परंपरा समाजाला घट्ट जखडून आहेत. मात्र, शहरामध्ये रूढी परंपरेचे बंधन तोडून एका विधवेचे तिच्या सख्ख्या दिराशी लग्नाचे अनोखे बंधन बांधण्यात आले आहे. त्यामुळे तरुणीच्या आयुष्याबरोबर आजच्या समाजाला एक नवी दिशा देण्याचा कुटुंबाचा निर्णय कौतुकास्पद ठरला आहे.

दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीच्या दत्तात्रय पाटील यांची कन्या सोनलचा सांगलीतील नामदेव पाटील यांचे चिरंजीव संतोष पाटील यांच्याशी विवाह झाला होता. लग्न होऊन २ वर्षे झाली. पदरी ६ महिन्याची मुलगी असतानाच पतीचे अकाली निधन झाले. यामुळे सोनालीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिच्या फुललेल्या संसाराला जणू नियतीची नजर लागली होती. अशा परिस्थितीमध्ये सोनलला आपल्या ६ महिन्याच्या चिमुरडीबरोबर पुढील आयुष्याचा प्रश्न पडला होता.

आपल्या मुलीच्या भावी आयुष्याचे कसे होईल? या चिंतेने सोनलच्या माहेरचे व्यथित होते. या भयाण परिस्थिती सोनलच्या सासरच्या मंडळींना एक धाडसी निर्णय घेण्याचे ठरवले. सोनलच्या पतीच्या धाकट्या भावाशी म्हणजेच दिराशी लग्न लावून देण्याचा निर्णय तिच्या सासरच्या मंडळीनी घेतला. विशेष म्हणजे उच्चशिक्षित असणाऱ्या पाटील कुटुंबातील महिलांनी हा विचार पुढे आणत लग्नाच्या रूढी परंपरा मोडीत काढत अनोख्या लग्नाचा मुहूर्तमेढ रोवला.

संतोषच्या आई आणि सोनलच्या सासू राजश्री पाटील यांना आपल्या मुलाच्या ६ महिन्याची नात आणि सूनेच्या भविष्याची चिंता होती. त्यामुळे सोनलला आयुष्यभर सांभाळण्याचा निश्चय राजश्री पाटील यांनी केला. मात्र, घरात लग्नाचा एक मुलगा होता. त्याचे लग्न झाल्यावर येणारी सून मोठ्या मुलाच्या मुलीला प्रेम देईल का? शिवाय दोन्ही सुनांमध्ये नातेसंबंध कितपत चांगले राहतील? या विचारातुन पुरोगामी असणाऱ्या राजश्री पाटील यांनी आपल्या धाकट्या मुलाशी सोनलचे लग्न लावून देण्याचा धाडसी निश्चय केला. सर्व विचार धाकटा मुलगा उमेश आणि सून सोनलसमोर मांडले. त्यानंतर सोनलच्या माहेरच्या मंडळींकडूनही या लग्नाला होकार मिळाला. नुकतेच अगदी साध्या पध्दतीने सोनल आणि उमेश या दीर भावजयची लग्नगाठ बांधली.

उमेश आणि सोनल या नवदाम्पत्याने आता चिमुकलीसोबत नवा संसार थाटात सुरू केला आहे. या लग्नामुळे आपल्या अंधारमय जीवनात पुन्हा प्रकाश पडला असून त्याच घरची पुन्हा सून झाल्याने आंनद होत असल्याची भावना सोनलने व्यक्त केली आहे. भावाची मुलगी आपल्या घरी राहील अशीही भावना मनात होती. त्यामुळे लग्नाला होकार दिल्याचे उमेशने सांगितले.

सांगलीच्या मराठा समाजानेही पाटील कुटुंबाच्या या पुरोगामी निर्णयाचे स्वागत केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर मराठा समाजात एक क्रांतिकारक बदल घडवणार हा निर्णय असून या लग्नामुळे नात्याला माणुसकीची किनार मिळाल्याची भावना मराठा समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

खरे तर विधवेचे पुन्हा लग्न ही गोष्ट आश्चर्य वाटणारी नाही. मात्र, एखाद्या विधवेचे लग्न तिच्या सख्ख्या दिरासोबत पुन्हा लावून देणे ही धाडसी गोष्ट आहे. शिवाय आजच्या पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह सुद्धा ठरली आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली

PKG - स्पेशल .

FEED SEND - FILE NAME - R_MH_1_SNG_16_MARCH_2019_ANOKHE_LAGN_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_7_SNG_16_MARCH_2019_ANOKHE_LAGN_SARFARAJ_SANADI

स्लग - रूढी परंपरांचे बंधन तोडत विधवा वहिनीशी दिराने बांधली लग्न गाठ, कुटुंबांच्या पुढाकारने घडली क्रांतिकारक घटना..

अँकर - कुछ तो लोग कहेंगे,लोगो का काम है केहना ! असं असलं तरी आजच्या काळात अनेक रूढी परंपरा समाजाला घट्ट जखडून आहेत..पण सांगली मध्ये लग्नाच्या एक रूढी परंपरेचे बंधन तोडून एका विधवेचे तिच्या सख्खा दिराशी लग्नाचे अनोखे बंधन बांधण्याची क्रांतिकारक घटना घडली आहे.यामुळे तरुणीच्या आयुष्याबरोबर आजच्या समाजाला एक नवी दिशा देण्याचा कुटुंबाचा निर्णय कौतुकास्पद ठरला आहे.मराठा समाजाने या निर्णयाचे स्वागत करत हे लग्न महाराष्ट्राला भूषणावह असल्याचे मत व्यक्त केले आहे. Body:व्ही वो - दोन वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीच्या दत्तात्रय पाटील यांची कन्या सोनल हीचा सांगलीतील नामदेव पाटील यांचे चिरंजीव संतोष पाटील याच्याशी झाला होता.लग्न होऊन दोन वर्षे झाली होती,आणि पदरी सहा महिन्याची मुलगा अश्यात पतीचे अकाली निधन झाले.
यामुळे सोनाली पाटील हिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले होते.सोनलच्या फुललेला संसाराला जणू नियतीची नजर लागली होती.अशा परिस्थितीमध्ये सोनलला आपल्या सहा महिन्याच्या चिमुरडीबरोबर पुढील आयुष्याचा प्रश्न पडला होता.तर आपल्या मुलीच्या भावी आयुष्याचे कसे होईल ? या चिंतेने सोनालच्या माहेरचे व्यथित होते.आणि अश्या या भयाण परिस्थिती सोनलच्या सासरच्या मंडळींना एक धाडसी निर्णय घेण्याचे ठरवले.तो म्हणजे सोनलच्या पतीच्या धाकटया भावाशी म्हणजेच दिराशी लग्न लावून देण्याचा.विशेष म्हणजे उच्चशिक्षित असणाऱ्या पाटील कुटुंबातील महिलांनी हा विचार पुढे आणत लग्नाच्या रूढी परंपरा मोडीत काढत अनोख्या लग्नाचा मुहूर्तमेढ रोवला .

बाईट - रेखा पाटील - नातेवाईक, .सांगली.

व्ही वो - संतोषच्या आई आणि सोनालाच्या सासू यांना राजश्री पाटील यांना आपल्या मुलाच्या सहा महिन्याची नात आणि सून हिच्या भविष्याची चिंता होता.तर सोनलाला आयुष्यभर सांभाळण्याचा निश्चय राजश्री पाटील यांनी केला.पण घरात आपला लग्नाचा एक मुलगा होता, आणि उद्या त्याचे लग्न झाल्यावर येणारी सून मोठ्या मुलाच्या मुलीला प्रेम देईल का,शिवाय दोन्ही सुनांच्या मध्ये नातेसंबंध कितपत चांगले राहतील या विचारातुन पुरोगामी असणाऱ्या राजश्री पाटील यांनी आपल्या धाकट्या मुलाशी सोनलचे लग्न लावून देण्याचा धाडसी निश्चय केला,आणि हे सर्व आपला धाकटा मुलगा उमेश आणि सून सोनल हिच्यासमोर मांडले,यानंतर सोनलच्या माहेरच्या मंडळांकडूनही या लग्नाला होकार मिळवत ,नुकतेच सध्या पध्दतीने सोनल आणि उमेश या दीर भावजयची लग्नागाठ बांधली .

बाईट - राजश्री पाटील - सोनलच्या सासू व उमेशच्या आई-सांगली .

व्ही वो - उमेश आणि सोनल या नवं दांम्पत्यांने आता आपला नवा संसार चिमुकलीसोबत थाटात सुरू केला आहे.या लग्नामुळे आपलं अंधारमय जीवनात पुन्हा प्रकाश पडला असून त्याचा घरची पुन्हा सून झाल्याने आंनद होत.असल्याची भावना सोनल पाटील हिने व्यक्त केली आहे.तर घरच्यांना मान्य असेल तर मला काहीच अडचण नाही ,असे स्पष्ट करत आपण लग्नास होकार लगेच होकार दिला.शिवाय आपल्या भावाची मुलगी आपल्या घरी राहील,ही भावना सुद्धा आपल्या मनात होती.असे मत उमेश याने यावेळी व्यक्त केले.

बाईट - सोनल पाटील ,सांगली

बाईट - उमेश पाटील - सोनलचे पती.सांगली.

व्ही वो - सांगलीच्या मराठा समाजानेही पाटील कुटुंबाच्या या पुरोगाम निर्णयाचे स्वागत केले आहे.संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर मराठा समाजात एक क्रांतिकारक बदल घडवणार हा निर्णय असून या लग्नामुळे नात्याला माणुसकीची किनार मिळाल्याची भावना मराठा समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Conclusion:खरं तर विधवेचे पुन्हा लग्न ही गोष्ट,आता फार नवल राहिली नाही,पण एखाद्या विधवेचे लग्न तिच्या सख्ख्या दिरा सोबत पुन्हा लावून देणे,ही खूप धाडसी गोष्ट तर आहेच.शिवाय आजच्या पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह सुद्धा ठरली आहे , असंच म्हणावं लागेल.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.