वेलिंग्टन Playing 11 Announced : इंग्लंड क्रिकेट संघाला 6 डिसेंबरपासून वेलिंग्टन मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळायचा आहे. या सामन्यासाठी इंग्लंड संघानं दोन दिवस आधीच आपल्या प्लेइंग 11 घोषणा केली आहे. इंग्लंडनं मालिकेतील पहिला सामना 8 विकेटनं जिंकला होता.
संघात काय बदल : इंग्लंड क्रिकेट संघ सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे, ज्यामध्ये त्यांनी क्राइस्टचर्च इथं खेळलेला पहिला सामना 8 गडी राखून जिंकला. आता या मालिकेतील दुसरा सामना वेलिंग्टनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे, ज्यासाठी इंग्लंडनं आपल्या प्लेइंग 11 ची केली आहे. या सामन्यासाठी, इंग्लंड संघानं आपल्या प्लेइंग 11 बाबत मोठा निर्णय घेतला आहे, या सामन्यातही ऑली पोप यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे, तर जेकब बेथेलला पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळणार आहे.
Our XI for the second Test against New Zealand has been announced 👇@IGcom | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) December 4, 2024
बेथेलची दुसऱ्या डावात आक्रमक खेळी : क्राइस्टचर्च कसोटी सामन्यात जेकब बेथेलला इंग्लंड संघाच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं तेव्हा सर्वांनाच वाटलं की त्याच्याबाबतचा निर्णय लवकर घेतला गेला नाही. या 21 वर्षीय खेळाडूला पहिल्या डावात 34 चेंडूंचा सामना केल्यानंतर केवळ 10 धावा करण्यात यश आलं. पण यानंतर त्यानं दुसऱ्या डावात आपल्या प्रतिभेची सर्वांना ओळख करून दिली आणि अवघ्या 37 चेंडूत विक्रमी अर्धशतक झळकावून इंग्लंडला सामना जिंकून दिला.
जो रुटच्या कामगिरी वर लक्ष : पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीतील दीर्घ अंतरामुळं पहिल्या सामन्यात 10 बळी घेणारा इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज ब्रॅडन कार्स हाही संघात सामील आहे. वेलिंग्टन कसोटी सामन्यातही इंग्लंडचा प्रमुख फिरकी गोलंदाज शोएब बशीर मैदानात उतरणार आहे. इंग्लंडसाठी या कसोटी सामन्यात जो रूटच्या कामगिरीवरही लक्ष केंद्रित केलं जाईल, ज्यामध्ये तो पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात एकूण 23 धावाच करू शकला.
❌ ALL OUT ❌
— England Cricket (@englandcricket) December 1, 2024
Brydon Carse gets the final wicket of Daryl Mitchell to bring New Zealand’s innings to a close.
We need 1️⃣0️⃣4️⃣ to win! 💪
🇳🇿 2️⃣5️⃣4️⃣ pic.twitter.com/XxjcZy39ep
न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग 11 :
झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (यष्टिरक्षक), बेन स्टोक्स (कर्णधार), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर.
हेही वाचा :