सांगली - शहराचा काय विकास केला आहे? हे समोर येऊन सांगा, असे आव्हान देत, निकाल स्पष्ट झाल्यावर माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय (Kavathemahankal Nagar Panchayat Election) राहणार नाही असा खणखणीत इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी ( Rohit Patil In Kavathemahankal) विरोधकांना दिला आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक प्रचारच्या सभेत ते बोलत होते.
रोहित पाटील विरुद्ध दिग्गज पक्ष
कवठेमहांकाळ निवडणुकीत प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. या निवडणुकीच्या निमित्ताने रोहित आर. आर. पाटील यांच्या विरोधात सर्व दिग्गज विरोधक एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. (Nagar Panchayat Election 2021) रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस 13 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवत आहे. 21 डिसेंबर रोजी नगरपंचायतीसाठी मतदान पार पडणार आहे. रविवारी या निवडणुकीचा जाहीर प्रचार थांबला आहे.
त्यावेळी माझ्या बापाची आठवण येईल
राष्ट्रवादीच्या शेवटच्या प्रचार सांगता सभेत रोहित पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले, १९ जानेवारीला निकाल स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आत्ता ज्यांच्याहाती १५ वर्षे सत्ता होती, नगरपंचायत होती आज तेच लोक आदर्श नगरपंचायत घडविण्यासाठी एकत्र आले आहे असे म्हणत आहेत. आदर्श घोटाळा ऐकला होता. आता आदर्श नगरपंचायत काय आहे? ते सांगतो. जे लोक संडासच्या बाथरूममध्ये पैसे खातात त्या लोकांची वृत्तीसुद्धा तिथे बसण्याचीच असू शकते.
मी कवठेमहांकाळचा परिसर संपूर्ण पिंजून काढला आहे
मी कवठेमहांकाळचा परिसर संपूर्ण पिंजून काढला आहे. विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे, हे मला माहित आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे, जे लोक मला सल्ले देण्याचे काम करत आहेत त्यांनी या शहरात काय विकास कामे प्रलंबित आहेत, त्यांनी माझ्या पुढे येऊन सांगावे. बघूया कोण काय सांगते? किती विकास झालाय आणि किती विकास व्हायचा राहिलाय असे प्रतिआव्हान रोहित आर. आर. पाटील यांनी कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना दिले आहे.
हेही वाचा - एकाकी ज्युनिअर आर. आर. पाटलांना आता अजित पवारांची ताकद