ETV Bharat / state

रणधुमाळी लोकसभेची : सांगलीत ६५ टक्के मतदानाची नोंद; वाढलेला टक्का कोणाला देणार धक्का - BJP

सांगली लोकसभा मतदारसंघात ६५ टक्के मतदानाची नोंद... गत निवडणुकीपेक्षा १ टक्क्यांनी वाढले मतदान... धाकधुक वाढलेल्या उमेदवारांचे आता निकालाकडे लक्ष्य

सांगली लोकसभा मतदारसंघात ६५ टक्के मतदानाची नोंद
author img

By

Published : Apr 24, 2019, 2:18 PM IST

सांगली - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. सांगली मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले आहे. गतवेळ पेक्षा यंदा १ टक्का मतदान वाढल्याने हा वाढलेले टक्का कोणाला धक्का देणार, याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली असून २३ मे रोजी याचा फैसला होईल आणि सांगलीच्या मतदाराने आपला खासदार म्हणून कोणाला निवडले याचेही चित्र स्पष्ट होईल.

सांगलीत ६५ टक्के मतदानाची नोंद

तिसऱ्या टप्प्यातील सांगली लोकसभेसाठी मंगळवारी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. ईव्हीएम मशीनमधील बिघाडामुळे उडालेला गोंधळ वगळता मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले आहे. यंदाच्या या मतदारसंघात निवडणूक रिंगणात १२ उमेदवार होते. मात्र, खरी लढत भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातच तिरंगी लढत झाली. यावेळी चुरशीने झालेल्या या निवडणुकीत ६५ टक्के इतके मतदान झाले आहे. गत वेळी मोदी लाटेत ६३.६८ टक्के इतके मतदानाची नोंद झाली होती. मात्र, गतवेळी पेक्षा यंदा सव्वा टक्क्याने वाढ झाली असून हा वाढलेले मतदानाचा टक्का कोणाला धक्का देणार याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.

तिरंगी लढतीत कोण होणार खासदार-

भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील, काँग्रेस महाआघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली, तिन्ही उमेदवारांनी मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. नेहमी या लोकसभेच्या मैदानात दुरंगी रंगणारा सामना यंदा तिरंगी आणि तोही प्रचंड चुरशीची पाहायला मिळाला.

यावेळी या निवडणुकीत सव्वा टक्के अधिक मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे हा वाढलेला मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याच्या चर्चा गावच्या पारावर रंगु लागल्या आहेत. तर विद्यमान खासदार संजयकाका पुन्हा खासदार होणार ? की विशाल पाटील भाजपला शह देऊन शेतकऱ्यांचे खासदार होणार ? की वंचितचे गोपीचंद पडळकर बाजी मारणार याबाबत राजकीय विश्लेषकही बुचकाळ्यात पडले आहेत. मतदारराजाने आपला कौल ईव्हीएममध्ये बंद केला असून त्यांचा खासदार कोण हे २३ मे'लाच स्पष्ट होईल.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

av

feed send - file name - R_MH_1_SNG_24_APR_2019_MATDAN_TAKKA_SARFARAJ_SANADI

या बातमीसाठी काल FTP वरून पाठवलेले फुटेज वापरण्यात यावे...

स्लग - सांगली लोकसभेसाठी ६५ टक्के मतदानाची नोंद..वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार याची धाकधूक ...

अँकर - सांगली लोकसभेसाठी अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणूकीत ६५ टक्के मतदान झाले आहे.गतवेळ पेक्षा यंदा १ टक्का मतदान वाढल्याने हा वाढलेले टक्का कोणाला धक्का देणार ,याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली असून २३ मे रोजी याचा फैसला होणार आहे.आणि सांगलीच्या मतदाराने आपला खासदार कोणाला बनवले हे कळणार आहे...

Body:व्ही वो - तिसऱ्या टप्प्यातील सांगली लोकसभेसाठी मंगळवारी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली आहे.ईव्हीएम मशीन मधील बिघाडामुळे उडालेला गोंधळ वगळता शांततेत मतदान पार पडले आहे.
यंदाच्या या मतदारसंघात निवडणूक रिंगणात १२ उमेदवार होते.मात्र भाजप,
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात ही तिरंगी लढत झाली.आणि चुरशीने झालेल्या निवडणुकीत ६५ टक्के इतके मतदान झाले आहे.गत वेळी मोदी लाटेत ६३.६८ टक्के इतके मतदानाची नोंद झाली होती.पण
गत वेळी पेक्षा यंदा सव्वा टक्क्याने वाढ झाली असून.हा वाढलेले मतदानाचा टक्का कोणाला धक्का देणार याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.
या निवडणुकीत तिरंगी लढत झाली.
भाजपाचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील ,काँग्रेस महाआघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात काट्याची टक्कर पहायला मिळाली,तिन्ही उमेदवारांनी मतदार संघात प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता.नेहमी या लोकसभेच्या मैदानात दुरंगा निवडणूक जनतेने पहिली होती.मात्र यंदा तिरंगी आणि तीही प्रचंड चुरशीची निवडणूक सांगलीकर जनतेला अनुवभवण्यास मिळाली.आणि परिणामी यावेळी या निवडणुकीत सव्वा टक्के अधिक मतदानाची नोंद झाली आहे.
यामुळे हा वाढलेला मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार आणि
विद्यमान खासदार संजयकाका पुन्हा खासदार होणार ? की विशाल पाटील खासदारकीची षटकार लावणार ? की वंचितचे गोपीचंद पडळकर बाजी मारणार याबाबत राजकीय विश्लेषकही बुचकाळात पडले आहेत.तर मतदार राजाने आपला कौल ईव्हीएम मध्ये बंद केले,असून २३ मे रोजी हा कौल कोणाच्या बाजूने आहे,याचा फैसला होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.