ETV Bharat / state

सांगलीच्या गिरजवडे गावातील घरांवर दगडांचा वर्षाव, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण - अंधश्रद्धा निर्मुलन समिती

शिराळा तालुक्यातील गिरजवडे या गावातील घरांवर मागील सात दिवसांपासून दगडांचा वर्षाव होत असून गावात भीतीचे वातावण पसरले आहे.

दगडांमुळे कोलांचे झालेले नुकसान
author img

By

Published : Nov 19, 2019, 8:43 AM IST

Updated : Nov 19, 2019, 10:55 AM IST

सांगली - शिराळा तालुक्यातील गिरजवडे या गावातील घरांवर मागील सात दिवसांपासून दगडांचा वर्षाव होत आहे. यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत समाज माध्यमांवर उलट-सुलट चर्चा सुरू असून अंधश्रद्धा पसरवू नये, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

माहिती देताना ग्रामस्थ आणि अंनिसचे सचिव

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील गिरजवडे येथे मागील सात दिवसांपासून गावातील घरांवर दगडांचा वर्षाव होत आहे. यामध्ये सहा सात घरांच्या कौलांची चाळण झाली आहे.रात्रीच्या वेळी घरावर दगड पडत असल्याने कौलारू फुटून दोन महिला किरकोळ जखमी झाले आहेत. यामुळे गावातील नागरिक भीतीच्या छायेत वावरत असून संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. रात्र झाली की गावातील लोकांना भीतीने धडकीच बसते आहे. यासाठी गावातील गावकरी रात्रभर गावाला पहारा देत आहेत. तरी सुद्धा घरावर कोण दगड मारते हे समजू शकले नाही.

गावातील देवीचा कोप झाल्यानेच घरावर दगड पडत असल्याचे पोस्ट समाज माध्यमांवर फिरत आहेत. याबाबत येथील युवकांना विचारले असता, असे काही नसून लोकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून, अशा काही पोस्ट पसरवू नये, असे म्हणणे आहे. दगड फेकीच्या घटनांबाबत गावातील नागरिकांनी शिराळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस तपास करत आहेत.

याबाबत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांच्याकडून जाणून घेतले असता, हा प्रकार मानव निर्मित असून याला भानामतीचे प्रकार म्हणतात. ही अंधश्रद्धा असून लोकांनी न घाबरता आमच्या संपर्क करावा, हे कारस्थान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

हेही वाचा - भंगार कपाटात सापडलेले 7 तोळे सोन्याचे दागिने केले परत, भंगारवाल्याचे सर्वत्र कौतुक

Intro:Body:.Conclusion:अँकर - गेल्या सात दिवसांपासून एक गावात घरांवर दगडांचा वर्षाव होत आहे.कुणाच्या मते हा देवीचा प्रकोप आहे,तर कुणाच्या मते हा खोडसाळ पणा आहे.पण घरांवर पडणाऱ्या या दगडांच्या घटनेमुळे संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील गिरजी वाडी मध्ये हा प्रकार घडत आहे.
----------------------------------------------------------
स्लग - गावात होतोय दगडांचा वर्षाव,देवीच्या प्रकोपाची चर्चा ! ग्रामस्थ मात्र दहशतीखाली…
तर गावातील देवस्थान पूर्वीपासून श्रद्धास्थानी असल्याने देवीमुळे असले प्रकार होत नसल्याचे युवा वर्गातून बोलले जाते.
----------------------------------------------------------
व्ही वो - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील गिरजवडे येथे गेल्या सात दिवसापासून गावातील घरांवर दगडांचा वर्षाव होत आहे.यामध्ये सहा सात घरांच्या कौलांची चाळण झाली आहे.रात्रीच्या वेळेस घरावर दगड पडत असल्याने कौले फुटून दोन महिलां किरकोळ जखमी झाले आहेत. यामुळे गावातील नागरिक भीतीच्या छायेत वावरत असून संपूर्ण गाव दहशतीखाली आहे.रात्र झाली कि गावातील लोकांना भीतीने धडकीच बसते आहे.यासाठी गावातील गावकरी रात्रभर गावाला पहारा देत आहे.तरी सुद्धा घरावर कोण दगड मारते हे समजू शकले नाही.यामुळे गावातील ताईआई देवीचा कोप झल्यानेच घरावर दगड पडत असल्याचे जेस्ट मंडळी सांगत आहेत.कारण गावात पूर्वी पासून एका चिंचेच्या झाडाखाली एका प्राण्याचा बळी देण्याची परंपरा असल्याचे बुजुर्ग सांगतात ते न दिल्यानेच असे प्रकार घडत असल्याचे काही मंडळी सांगत आहेत.तर याला युवा वर्गातून विरोध असून आतापर्यंत गावातील ग्राम देवांचा गावावर चांगलंच आशीर्वाद राहिला आहे.शिवाय असले प्रकार कोणी अज्ञात वेक्तीच करत असावी यासाठी .गावातील नागरिकांनी शिराळा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिस तपास करत आहेत.
----------------------------------------------------------
संजय बनसोडे,,(राज्य प्रधान सचिव महाराष्ट्र अं नि स..) गिर्जवडे ता शिराळा येथील होणारा प्रकार हा मानव निर्मित आहे,घरावर दगड पडणे,कपडे आपोआप जळणे,अंगावर जखम होणे,बिंब्याच्या फुल्या उमटणे असे प्रकार घडतात त्यास भानामतीचे प्रकार म्हणतात.हे सर्व अंधश्रध्देचे प्रकार आहेत,हे सर्व रोखता येतात.ज्या लोकांच्या घरावर दगड पडतात त्यांनी महाराष्ट्र अं नि स शी संपर्क करावा.नागरिकांनी घाबरून न जाता सामोरे जावे,हे प्रकार कोण करते आहे याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते,आम्ही प्रबोधन करायला तयार आहे:
Last Updated : Nov 19, 2019, 10:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.