सांगली - राज्य शासनाच्या पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेच्या मंजूर कामांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे तासगाव येळावी येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
येळावी येथे राज्य शासनाच्या पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेतून रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तसेच यासाठी आवश्यक निधी देखील मंजूर झाला आहे. परंतु, तासगाव तहसील प्रशासनाकडून संबंधित कामांची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडले आहे. मंजूर रस्त्यांची कामे तातडीने करण्यात यावी, ही मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे.