ETV Bharat / state

दहशतवादी कारवायाच्या संशयावरून वाळव्यातील तरुणाला उत्तर प्रदेश एटीएसने घेतले ताब्यात - एटीएस

दहशतवादी कारवायाशी संबंध असल्याच्या संशयावरून सांगलीच्या वाळवा येथील अर्जुन खराडे नावाच्या तरुणास उत्तर प्रदेशच्या 'दहशतवादी प्रतिबंधक पथका'ने ताब्यात घेतले आहे.

अर्जुन खराडे
author img

By

Published : Nov 3, 2019, 1:24 PM IST

सांगली - दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून सांगलीच्या वाळवा येथील एकास उत्तर प्रदेशच्या 'दहशतवादी प्रतिबंधक पथका'ने ताब्यात घेतले आहे. अर्जुन खराडे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे वाळवा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सांगलीच्या वाळवा येथील अर्जुन खराडे या तरुणाला उत्तर प्रदेशच्या एटीएसच्या पथकाने गुप्तपणे कारवाई करत ताब्यात घेतले आहे. अर्जुन याचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याने त्याचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय उत्तर प्रदेश एटीएस पथकाला आला. त्यावरून ३ दिवसांपूर्वी 'दहशतवादी प्रतिबंधक पथकाने' वाळव्यात येवून अर्जुनला अटक केली. सध्या अर्जुन हा लखनऊ पोलिसांच्या कोठडीत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - प्रधानमंत्री पीक विमा नव्हे, कार्पोरेट कल्याण योजना - राजू शेट्टी

अर्जुन हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे, मात्र त्याचे राहणीमान राजेशाही पद्धतीचे होते. त्याचे महागडे कपडे घालणे आणि चारचाकीमधून फिरणे हे विषय गावात चांगलेच रंगले होते. यातच त्याला दहशतवादी कारवायाच्या संशयावरून ताब्यात घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - सांगलीत विभागीय आयुक्तांनी केली नुकसानग्रस्त फळबागांसह पिकांची पाहणी

Intro:mh_sng_01_ats_karwai_in_walav_vis_01_7203751 - to - mh_sng_01_ats_karwai_in_walav_img_02_7203751

स्लग - दहशतवादी कारवायाच्या संशयावरून वाळव्यातील तरुणास उत्तर प्रदेश एटीसने घेतले ताब्यात..

अँकर - दहशतवादी कारवायाशी संबंध असल्याच्या संशयावरून सांगलीच्या वाळवा येथील एकास उत्तर प्रदेशच्या दहशतवादी प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले आहे.अर्जुन खराडे असे या तरुणाचे नाव आहे.या घटनेमुुुळे वाळवा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. Body:सांगलीच्या वाळवा येथील अर्जुन खराडे या तरुणाला उत्तर प्रदेशच्या एटीएसच्या पथकाने गुप्तपणे कारवाई ताब्यात घेतले आहे.अर्जुन खराडे याच्या मोठे आर्थिक व्यवहार झाल्याने त्याचा दहशतवादयांशी संबंध असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेश एटीएसने अर्जुन याला ताब्यात घेतले आहे.तीन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या दहशतवादी प्रतिबंधक पथक हे वाळवा येथे आले होते.आणि त्यांनी अर्जुन याला ताब्यात घेतले आहे.सध्या अर्जुन हा लखनो पोलीसांच्या कोठडीत असल्याची माहिती समोर आली आहे.
अर्जुन हा शेतकरी कुटुंबातील आहे,पण त्याचे राहणीमान राजेशाही सारखे होते. महागडे कपडे घालणे आणि चार चाकी मधून फिरणे या थाटाचा विषय गावात चांगलाच रंगला होता.आणि त्याला दहशतवादी कारवायाच्या संशयावरून ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.