ETV Bharat / state

सांगलीत लॉकडाऊनचे उल्लंघन; टास्क फोर्सने दिली तरुणांना 'अनोखी' शिक्षा

सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. पालिका क्षेत्रात नियमांचे पालन करण्यासाठी पालिका प्रशासनाने माजी सैनिकांची स्पेशल टास्क फोर्स स्थापन केली आहे. या फोर्सकडून शहरात नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या फोर्सने फिजिकल डिस्टन्सिंचे नियम न पाळता कुपवाड भागात काही तरुणांना अनोखी शिक्षा दिली.

unique punishment who broke lockdown rules by mnc task force sangli
सांगलीत लॉकडाऊनचे उल्लंघन; टास्क फोर्सने दिली तरुणांना 'अनोखी' शिक्षा
author img

By

Published : Jul 26, 2020, 12:45 PM IST

सांगली - लॉकडाऊनचे काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अनोखी शिक्षा देण्यात आली आहे. जमिनीवर लोटांगणपासून हातावर चालणे, एकमेकाला ओढत घेऊन जाण्याची शिक्षा करण्यात आली. महापालिकेने स्थापन केलेल्या स्पेशल टास्क फोर्सकडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. कुपवाड येथे ही कारवाई करण्यात आली.

सांगलीत लॉकडाऊनचे उल्लंघन; टास्क फोर्सने दिली तरुणांना 'अनोखी' शिक्षा

सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. पालिका क्षेत्रात नियमांचे पालन करण्यासाठी पालिका प्रशासनाने माजी सैनिकांची स्पेशल टास्क फोर्स स्थापन केली आहे. या फोर्सकडून शहरात नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या फोर्सने फिजिकल डिस्टन्सिंचे नियम न पाळता कुपवाड भागात काही तरुणांना दिली.

हेही वाचा - रविवारपासून अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू

यावेळी या माजी सैनिकांनी तरुणांना भर रस्त्यात सैन्य दलातील काही कसरती करायला लावल्या. तसेच उठा बशा, हातावर चालणे, दुसऱ्याच्या खांद्यावर पाय देऊन चालणे, लोटांगण, काठीने फटके अशा अनोख्या शिक्षा यावेळी दिल्या. तर टास्क फोर्सकडून कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात आली, आरोप नागरिकांनी केला. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या कारवाईची दखल पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतली. त्यांनी या पथकाला यापुढे केवळ दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.